लष्कराचे जवान बनले देवदूत, नदीत उडी घेऊन वाचवला मुलीचा जीव

52

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात एका मुलीसाठी सीआरपीएफचे जवान देवदूत बनले आहे. जवानांनी 14 वर्षीय मुलीला नदीत उडी घेऊन वाचवले. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यानंतर जवानांचे कौतुक होत आहे.

ड्यूटीवर तैनात असणाऱ्या जवानांना एका मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकू येतो. नदीच्या दिशेने येत असणाऱ्या आवाजाकडे जवान धाव घेतात. जवानांना नदीमध्ये दोन हात दिसतात आणि एक मुलगी वाहून जाताना दिसते. लष्कराचे जवान क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतात आणि पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध जात मुलीला वाचवतात. यानंतर इतरही जवान त्यांच्या मदतीला येतात.

एम.जी. नायडू आणि एन. उपेंद्र अशी मुलीला वाचवणाऱ्या या जवानांची नावे आहेत. दोघेही 176 बटालियनमध्ये कार्यरत आहेत. जवानांच्या धाडसाबद्दल सीआरपीएफच्या महासंचालकांमार्फत दिला जाणाऱ्या डीजी डिस्क या सर्वोच्च पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सीआरपीएफने ट्वीट करत या दोन जवानांना सलाम ठोकला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या