सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, दोन जवान जखमी

31

सामना प्रतिनिधी । गडचिरोली

केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने आपल्या सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. मंगळवारी (ता.६) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास एटापल्ली येथील जीवनगट्टा मार्गावरील सीआरपीएफ कॅम्पमध्ये ही घटना घडली. संघपाल विलास मारोती व एन.इंगळे अशी जखमी जवानांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजयचे या दोन जवानांसोबत भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातूनच संजयने गोळीबार केल्याचं समोर येत आहे. संजयला अद्याप याप्रकरणी अटक करण्यात आलेली नाही. संजयने गोळीबार का केला याची पोलीस चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या