पाकड्यांचा डर्टी गेम, CRPF च्या हेल्पलाईनवर फोन करून देतायत शिव्या

1408

जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. आंतरराष्ट्रीय समूहाकडून कोणतीच मदत मिळत नसल्याने आणि चीन वगळता सगळ्यांचा पाठिंबा हिंदुस्थानलाच मिळत असल्याने पाकड्यांना पोटदुखी झाली आहे. या पोटदुखीतून त्यांनी कश्मीर खोऱ्यातील जनतेसाठी सुरू करण्यात आलेली हेल्पलाईनवर फोन करून शिव्या द्यायला सुरुवात केली आहे.  इथल्या जनतेच्या मदतीसाठी सीआरपीएफने ‘मददगार’ ही हेल्पलाइन सुरु केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान मददगार हेल्पलाईनवर 7071 जणांनी फोन केले.यातील 171 फोन हे बाहेरील देशातून आले असून यात पाकिस्तानमधून आलेल्या फोनचाही समावेश आहे. या पाकड्यांनी फोन करून या हेल्पलाईनद्वारे संवाद साधणाऱ्यांना शिव्या दिल्या आहेत. 2700 फोन हे सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांनी केले असून हे फोन त्यांनी जवानांची ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी केले आहेत.

या हेल्पलाईनवर पाकिस्तानातून आलेले काही फोन हे त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी देखील आले होते असं CRPF च्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. कश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. यामध्ये लँडलाईन आणि इंटरनेटच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले होते. दहशतवादी फोन किंवा इंटरनेटचा गैरवापर करण्याची शक्यता असल्याने हे निर्बंध घालण्यात आले होते. अशा परिस्थितीत नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सीआरपीएफने ही हेल्पलाईन सुरु केली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या