अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून जवानाची आत्महत्या?

16

सामना ऑनलाईन । गडचिरोली

गडचिरोली येथे तैनात असलेल्या सीआरपीएफ-३७ बटालियनच्या जवानानं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. अहेरी येथील जवान अमितकुमार (२८)यांनी स्वताःच्या बंदुकीतून गोळी झाडून शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस याबाबत शोध घेत आहेत.

अमितकुमार मुळचे हरयाणा राज्यातील रहिवाशी होते. जवानांना अधिकारी त्रास देत असल्याने जवान आत्महत्या करत असल्याची चर्चा रंगत आहेत. गेल्या काही काळात अधिकारी त्रास देत असल्यानं जवानांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अमितकुमार यांनी आत्महत्या का केली? त्यांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण आहे, याचा शोध अहेरी पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या