CRPF चे जवान बनले देवदूत, चिमुरड्याची भूक भागवण्यासाठी भीषण थंडीत 12 किलोमीटर चालले

1136

जम्मू-कश्मीरमध्ये रामबनजवळ राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामध्ये अडकलेल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सीआरपीएफच्या जवान देवदूत बनले आणि कडाक्याच्या थंडीमध्ये तब्बल 12 किलोमीटर चालून लहान मुलांची भूक भागवली. भूस्खलनामध्ये महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तसेच गोठवणाऱ्या थंडीतही प्राणाची पर्वा न करता सीआरपीएफच्या जवानांना 12 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन भूस्खलनात अडकलेल्या कुटुंबीयांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवले. जवानांनी खाद्यपदार्थांसह मुलांसाठी दूधही पोहोचवले.

सीआरपीएफच्या 84 व्या बटालियनचे कमांडर डी.पी. यादव यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जम्मू-श्रीनगर महामार्गावर राजबन जवळील डिगडोल भागात अडकलेल्या आसिफा नावाच्या महिलेने मुलांची भूक भागवण्यासाठी सीआरपीएफकडे मदत मागितली होती. आसिफाने कुटुंबातील लोकांच्या मदतीने सीआरपीएफच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मागितली होती. यानंतर सीआरपीएफच्या 84 व्या बटालियनचे जवान तात्काळ भूस्खलनात अडकलेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी रवान झाले. या टीममधील इन्स्पेक्टर रघुवीरसह अन्य सीआरपीएफ जवानांनी कुटुंबीयांना आणि लहान मुलांपर्यंत खाद्यपदार्थ आणि दूध पोहोचवले.

डी.पी. यादव यांनी पुढे सांगितले की, भूस्खलनामुळे प्रचंड ट्राफिक जाम झाले होते. त्यामुळे वाहनाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचणे अशक्य होते. त्यामुळे सीआरपीएफच्या जवानांनी कडाक्याच्या थंडीतही 12 किलोमीटर चालत जावून कुटुंबापर्यंत मदत पोहोचवली. जवानांनी लहान मुलांना दूध आणि अन्य खाद्यपदार्थ दिले. सीआरपीएफच्या या मदतीसाठी आसिफा आणि त्यांच्या कुटुंबीयांना जवानांचे आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या