बाई पेटल्या, ३० कानाखाली मारल्या.. शाळेने केलं निलंबित

44
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । लखनऊ

लखनऊ येथील सेंट जॉन वियान शाळेच्या एका शिक्षिकेने क्रूरपणाची हद्द गाठली आहे. एका छोट्याशा चुकीसाठी एका विद्यार्थ्याला तीन मिनिटांत ३० वेळा कानाखाली मारल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं आहे.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून या शिक्षिकेचा क्रूरपणा स्पष्टपणे दिसत आहे. ही शिक्षिका शाळेत हजेरी घेत असताना हा विद्यार्थी चित्र काढत होता. त्यावेळी शिक्षिकेने त्याचं नाव उच्चारल्याचं त्याला लक्षात आलं नाही. इतक्या क्षुल्लक कारणावरून ही क्रूर शिक्षिका इतकी चिडली की तिने या मुलाला जोरदार थपडा मारायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर तिने त्या मुलाचं डोकं फळ्यावर आपटलं.

घरी गेल्यानंतर या विद्यार्थ्यांने घडलेली घटना पालकांना सांगितली. त्यानंतर मुलाच्या पालकांनी मुख्याध्यापक आणि पोलिसांकडे या शिक्षिकेची तक्रार केली. मुख्याध्यापकांनी घटनेची पडताळणी करण्यासाठी वर्गाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तेव्हा त्यात हे भयंकर चित्र दिसलं. या घटनेनंतर संबंधित शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. तसंच, शाळेतील इतर शिक्षकांना विद्यार्थ्यांशी असं न वागण्याचा इशारा शाळेतर्फे देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या