… म्हणून गेल्या तीन वर्षांपासून कावळे करताहेत त्याच्यावर हल्ला

गेल्या तीन वर्षांपासून मध्य प्रदेशातील शिवपुरी जिह्यातील शिवा केवट यांचं जगणं मुश्कील झाले आहेयाला जबाबदार दुसरेतिसरे कुणी नसून चक्क कावळे आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. शिवा केवट घराबाहेर पडताच कावळे त्यांना त्रास देतात. एका व्यक्तीने बदला घेतलेले आपण अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल मात्र काळ्यांनी अशा पद्धतीने बदला घेण्याची घटना आश्चर्यकारक आहे. आपल्या पिलाच्या मृत्यूसाठी शिवा केवट यांना जबाबदार धरत कावळे त्यांना आपला शत्रू मानून त्यांच्यावर हल्ला करीत आहेत.

सुमेला गावात राहणारे शिवा केवट जेक्हा कधी घराबाहेर पडतात तेव्हा त्यांची नजर सतत आकाशात असते. अस्मानी संकट आपल्यावर कोसळेल अशी भीती सतत त्यांना वाटत असते. घरातून बाहेर पडताच कावळ्यांचा हल्ला होईल, असे त्याला सारखे वाटत असते आणि तेच घडते. कावळे झुंडीने येऊन तीक्ष्ण नखे आणि चोचीने टोचून टोचून त्यांना हैराण करतात. त्यांच्या भोवती घिरट्या मारून काव कावकरून त्यांच्या अंगावर धावून जातात. या प्रकाराची सुरुवात तीन वर्षांपूर्वी झाली आहे. शिवा केवट यांना कावळ्याचे एक पिल्लू जाळीत अडकलेले दिसले होते. त्यांनी तत्काळ धा घेत त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हातून कावळ्याच्या पिलाचा मृत्यू झाला. पिलाचा मृत्यू झाल्यापासून शेजारी असणार्‍या काळ्यांनी शिवा यांना त्रास देण्यास सुरुवात केली.

काळ्यांच्या हल्ल्यामुळे शिवाला काही जखमा झाल्या आहेत. सुरुवातीला आपण हे फार गांभीर्याने घेतले नव्हते. पण नंतर लक्षात आले की कावळे दुसर्‍या कुणावर नव्हे तर फक्त आपल्यावरच हल्ला करीत आहेत. माझी ओळख पटवून ते फक्त माझ्याकरच हल्ला करतात, असे शिवा यांनी सांगितले.

कावळ्यांनी मला माफ करावे

कावळ्यांनी एखाद्या व्यक्तीला लक्षात ठेणे हे फार आश्चर्यकारक आहे. असे कधी होऊ शकते याची कल्पना नव्हती असे शिवा केवट यांनी सांगितले. इतक्या वर्षांनी तरी कावळे आपल्याला क्षमा करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. माझ्या हातून पिलाचा मृत्यू झाला. मी फक्त मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. पण हे मी त्यांच्यापुढे स्पष्ट करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया हतबलतेने शिवाने दिली. सध्यातरी कावळे त्यांना माफ करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत, असेच दिसते.

आपली प्रतिक्रिया द्या