CSK चा बॅट्समन आणि सायली संजीव… सोशल मीडियावर का रंगली चर्चा?

इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने तडाखेबंद फलंदाजी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. दमदार फलंदाजीमुळे आयपीएल सुरू असताना तो चांगलाच चर्चेत होता. मात्र आणखी एका गोष्टीमुळे तो चर्चेत आला. ते म्हणजे अभिनेत्री सायली संजीवच्या फोटोवर त्यानं केलेल्या कमेंटमुळे.

सायली संजीव ही मराठी टीव्ही, चित्रपट अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाची छाप तिनं प्रेक्षकांवर सोडली आहे. ‘काहे दिया परदेस’मधील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड यांचं इंस्टाग्राम चॅट व्हायरल झालं आहे. ज्यात दोघांनी एकमेकांना हार्ट इमोजी सेंड केल्याचं पाहायला मिळतं.

sayali-sanjeev-new

सायली 2016 मध्ये टीव्ही शो आणि चित्रपटातून इंडस्ट्रीत आली. काहे दिया परदेस नंतर काही चित्रपटांमधून ती झळकली.

sayali-sanjeev-new2

याआधी 2014 मध्ये अभिनेता सुशांत शेलारसह एका म्युझिक व्हिडीओत ती दिसली होती. टॉपटेन हिरोइन स्पर्धेत देखील तिनं सहभाग घेतला होता.

sayali-sanjeev-new1

नाशिकमध्ये आपल्या कॉलेजच्या एका कार्यक्रमात तिनं अभिनय केला होता. या कॉलेजमधून तिनं बीए केलं आहे. तर ऋतुराज गायकवाड याने महाराष्ट्रात डोमेस्टिक क्रिकेटमध्येही खेळून नाव मिळवलं आहे.

सायलीने अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे. तिचे ग्लॅमरस फोटो देखील सोशल मीडियावर खूप गाजले. सायलीने ऑनलाइन सीरीजमध्ये देखील काम केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या