लातुरात सांगलीची पुनरावृत्ती, पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू

34

सामना ऑनलाईन,लातूर

सांगलीतील अनिकेत कोथळे हत्या प्रकरण ताजे असतानाच लातुरातही पोलीस कोठडीत एका आरोपीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयाला निलंबित करण्यात आले आहे, तर निरीक्षक सुधाकर बावकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नरेंद्रसिंग हडियाल हा आरोपी लातूर पोलिसांच्या ताब्यात होता. दरोडा आणि अपहरण अशा गंभीर गुन्हय़ांत त्याला अटक झाली होती. एडशी येथे एका खासगी बसमधील प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचा आरोप त्याच्यावर होता. नरेंद्र सिंगला लातूर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली होती. त्याचे मुंबईतील लूटमार करणाऱया टोळीशी कनेक्शन असावे, असा पोलिसांना संशय होता. त्याला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते.

नरेंद्र सिंगचा कोठडीतच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. फिनेल प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर एका पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या