लग्नपत्रिकेतून होत होती ड्रग्जची तस्करी, पाहा हा धक्कादायक व्हिडीओ

958

ड्रग्जची तस्करी करणारे काय काय शक्कल लढवतील त्याचा नेम नाही. कधी केसाच्या विग खाली तर कधी अंतवस्त्रांमध्ये लपवून ड्रग्जची तस्करी केल्याचा प्रकार अनेकदा समोर आला आहे. आता तस्करांनी ड्रग्जची तस्करी करण्य़ासाठी लग्नपत्रिकांचा वापर सुरू केला आहे. लग्नपत्रिकेत्या पुठ्ठ्यांच्या मध्ये ड्रग्जची लपवलेली पाकिटे बंगळुरू विमानतळावर जकात अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत.

कर्नाटकमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पोलिसांनी एका प्रवाशाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एफेड्राईन नावाचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्याच्याकडील 43 लग्नपत्रिकांमध्ये 5 किलोचे अमली पदार्थ लपविण्यात आले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो सामना ऑनलाईनच्या हाती लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या