
हिंदुस्थानातील आघाडीची स्फोटके उत्पादक कंपनी असलेल्या सोलर ग्रुपवर सायबर हल्ला झाल्याची बाब समोर आली आहे. अज्ञात हॅकर्सनी हा हल्ला केला असून संवेदनशील डेटा चोरीला गेला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात नागपूर पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. सोलर ग्रुपकडून हिंदुस्थानी लष्करासाठीदेखील ‘मल्टिमोड ग्रेनेड्स’ बनविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर ही घटना सुरक्षा यंत्रणांनी गंभीरतेने घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची शक्यता आहे.