टाटांची सुप्रीम कोर्टात धाव, सायरस मिस्त्रींच्या पुनर्नियुक्तीला आव्हान

150

टाटा सन्सने सुप्रीम कोर्टात धाव घेत सायरस मिस्त्राr यांच्या अध्यक्षपदाच्या पुनर्नियुक्तीला आव्हान दिले आहे. ‘राष्ट्रीय कंपनी किधी अपिलीय न्यायाधीकरण’ने (एनसीएलएटी) 18 डिसेंबरला मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीचे आदेश दिले होते. याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती टाटा सन्सच्या वतीने सुप्रीम कोर्टाकडे करण्यात आली आहे.

येत्या 9 जानेवारीला टाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस या कंपनीची बैठक होणार असून त्यापूर्वी एनसीएलएटीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी टाटा सन्सने केली आहे. टाटा सन्सच्या वतीने एन. चंद्रशेखरन यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. पण एनसीएलएटीने ही नियुक्ती बेकायदा ठरवत मिस्त्री यांची नियुक्ती केली. पुढील चार आठवडय़ात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यापूर्वीच टाटाने एनसीएलएटीच्या आदेशाला आव्हान दिले आहे.

टाटा सन्सच्या 18 टक्के शेअर्सची मालकी असलेल्या मिस्त्र्ााr यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाऊ नये अशा सूचनादेखील एनसीएलएटीने दिल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिल्यास टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन.चंद्रशेखरन कायम राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या