दादर बाजारपेठ गुढीपाडव्यापर्यंत बंद; सरकार, पालिकेच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद

648

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबईत 50 टक्के दुकाने एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकार आणि पालिकेने घेतला आहे. सरकार आणि पालिकेच्या निर्णयाचे स्वागत करत दादरची बाजारपेठ गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवण्याचा उत्फूर्त निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे. गुढीपाडव्यापर्यंतच्या बंदमध्ये दादर व्यापारी संघटनेची 1000 दुकाने, कीर्तिकर मार्केटमधील श्री दादर इमिटेशन अँड कटलरी असोसिएशनची 80 दुकाने यांचा समावेश आहे, तर गुरुवारपासून मुंबई झवेरी बाजार इमिटेशन ज्वेलरी असोसिएशनची शेकडो दुकाने 4 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार इथे बंद
प्रभादेवी, वरळी, लोअर परळ, फोर्ट-बॅलार्ड इस्टेट, एम.जे.पी. मार्केट आणि जवळपासचा परिसर, कुलाबा-कफ परेड, नरीमन पॉइंट-चर्चगेट पश्चिम. (पुढील विभागातील काही मार्गांवरील दुकाने) ग्रॅण्ट रोड – गावदेवी, चर्नी रोड – गिरगाव, मुंबई-सेंट्रल ताडदेव, मलबार हिल – महालक्ष्मी, वांद्रे, खार, सांताक्रूझ, दादर, माटुंगा, वडाळा, शीव, अँटॉप हिल, मालाड पश्चिम, काळबादेवी, भुलेश्वर आणि सर्व कापड मार्केट, अंधेरी (प), जोगेश्वरी (प), विलेपार्ले (प)

मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार इथे दुकाने बंद
ग्रॅण्ट रोड – गावदेवी, चर्नी रोड – गिरगाव, मुंबई – सेंट्रल ताडदेव, मलबार हिल – महालक्ष्मी, वांद्रे, खार, सांताक्रूझ, दादर, माटुंगा, वडाळा, शीव, अँटॉप हिल, मालाड मालवणी, भुलेश्वर, काळबादेवी, अंधेरी (प), जोगेश्वरी (प), विलेपार्ले (प) या विभागातील काही मार्गांवरील दुकाने बंद राहतील.

मुंबईचे डबेवाले 31 मार्चपर्यंत सुट्टीवर
मुंबईतील नोकरदार वर्गाला रोज घरगुती जेवण नेऊन पोचवणाऱया मुंबईच्या डबेवाल्यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आपली सेवा उद्या पासून 20 मार्च ते 31 मार्च अशी 11 दिवसाच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय ‘मुंबई डबेवाला’ संघटनेने घेतला आहे.

मुंबई डबेवाला संघटनेनेही कोरोनाविरुद्धचे पाऊल म्हणून आपली सेवा 11 दिवस बंद ठेवण्याचे ठरवले आहे. राज्यातील दुकाने ,व्यापारी संघटना ,कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि ज्वेलर्स संघटनांनीही काही काळ बंद पाळत सरकारच्या गर्दी कमी करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. तसेच पाऊल जगभरात आपल्या कार्याची ख्याती पोचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी उचलले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या