महागाईवर भक्तीची मात…

सामना ऑनलाईन । मुंबई

महागाईने परिसीमा गाठली आहे, पण या महागाईवर भक्तीने मात केली. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी भाविकांचा उत्साह कायम होता. मुंबईतील बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. लाडक्या बाप्पासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. दादर मार्केटमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. महागाईचे विघ्न दूर कर रे बाप्पा! असे साकडे घालत भाविकांनी गणपतीसाठी खरेदी केली.