दादर ते सिद्धिविनायक मोफत वातानुकूलित बससेवा

33

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात येणाऱया भाविकांच्या सोयीसाठी कबुतरखाना-दादर ते रवींद्र नाटय़मंदिर यादरम्यान दिवसभर मोफत वातानुकूलित बससेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईसह देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अंगारकीला हजारो भाविक येथे दाखल होणार आहेत. अंगारकीनिमित्त मंदिर हार-फुले आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. मंगळवारी पहाटे ३.५० ते रात्री ८ वाजेपर्यंत आणि रात्री ९.३० ते १२  वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले राहील. दर्शनासाठी पुरुष, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर स्त्रीयांसाठी वेगवेगळ्या रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी दिली आहे.

दर्शनासाठी येणाऱया भाविकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिरात येताना पूजा-प्रसाद थाळी, लॅपटॉप, मौल्यवान वस्तू सोबत आणू नये तसेच फराळाकरिता धातूऐवजी प्लॅस्टिकचे डबे आणावेत अशा सूचना करण्यात आल्या आहे.

आपली प्रतिक्रिया द्या