
कोणी न जेवता न काही खाता राहू शकले आहे का? मात्र हुगळी जिल्ह्यातील श्यामबाजार पंचायतच्या बेलडीहा गावातील एक महिला गेली 50 वर्षे न जेवता जगत आहे. ही महिला फक्त चहा आणि द्रव पदार्थांवर पिऊन जीवन जगत आहे.
अनिमा चक्रवर्ती असे या आजीचे नाव असून त्या 76 वर्षांच्या आहेत. अनेक कुटुंबियांनी दावा केला की, ती 50 वर्षांपासून न खाता जीवन जगत आहे. अनिमा चक्रवर्तीच्या मुलाने सांगितले की, आधी आमच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बेताची होती आणि माझी आई लोकांच्या घरी काम करायला जायची. ती तिथून जे काही तांदूळ, कुरमुरे आणायची ती संपूर्ण घरात द्यायची. यात तिच्यासाठी खायला काहीच उरायचे नाही. त्यावेळी ती चहा वगैरे पिऊनच आपली भूक भागवायची.
अनिमा यांच्या म्हणण्यानुसार, तिला जिवंत राहण्यासाठी चहा तसेच अन् द्रव पदार्थांमधून पोषक तत्वे मिळतात. ते ती पिते आणि त्याचमुळे तिचे आरोग्य चांगले आहे. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. जेवढे रुग्ण कोमात आहेत, जे भरपूर दिवसांपासून आजारी आहेत तेही द्रव पदार्थांच्या माध्यमातून जगत आहेत. परिसरातील काही लोकांनी सांगितले की अनिमा ही एक वृद्ध महिला काही न खाता स्वस्थ जीवन जगत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, माणूस एक दिवसही न खाता पिता राहू शकत नाही, मात्र ती कित्येक वर्षांपासून असेच जीवन जगत आहे.