डहाणूच्या चिकूला मिळाले भौगोलिक मानांकन

186

<<   प्रशांत येरम  >>  <<  [email protected] >>

डहाणूला लाभलेला समुद्रकिनारा, चिकूच्या बागा हे इथले वैशिष्टय. पालघर जिह्यातील डहाणू परिसर हा चिकूसाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्यात आता डहाणू घोलवड चिकूला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.

कोकणातला आंबा, नागपूरची संत्री, तसं डहाणू म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चिकू. जुलै २०१६ मध्येच डहाणू घोलवडच्या चिकूचा जिऑग्रॉफिकल इंडिकेशन (जीआय) यादीमध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र यासंबंधीचे प्रमाणपत्र २७ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाला मिळाले. त्यामुळे आपल्या फळाच्या सन्मानाचा जल्लोष करण्यासाठी डहाणूकर सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे जे शेतकरी चिकू उत्पादक संघाकडे नोंदणीकृत आहेत त्यांनाच या टॅगचा वापर करता येईल. डहाणूतील चिकू बागायतदारांसाठी ही अभिमानास्पद बाब असून आर्थिक विकास साधण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे.

चिकूपासून ब्रेकफास्ट सेरिअल मिक्स, चिप्स आणि चॉकलेट्स बनवतात. घोलवड भागातील कॅल्शियमयुक्त जमिनीमुळे येथील चिकूला विशिष्ट असा गोडवा मिळाला आहे. भौगोलिक मानांकनामुळे चिकू वाईन उत्पादनाला चालना मिळणार आहे. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर डहाणू-घोलवड चिकूची ओळख निर्माण होईल.

चिकू म्हटलं की फार फार तर आठवतं ते चिकू मिल्क शेक. पण चिकूपासून चिकू पावडर, चिकू चटणी, लोणची, चिकू मिठाई, चिकू कपकेक, चिकू चिप्स, चिकू हलवा असे एक ना अनेक पदार्थ बनवले जातात.

चिकू आपल्या विशेष चवीमुळे सर्वांच्या आवडीचे फळ बनले आहे. चिकू खाल्ल्याने उत्साह वाढतो. कारण यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूमध्ये ७१ टक्के पाणी. १.५ टक्के प्रोटीन आणि २५.५ टक्के कार्बोहायड्रेट असते. यामध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात तर व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असते. तसेच व्हिटॅमिन ई आढळते जे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

चिकूमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमणात असते. याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची शक्ती वाढते. चिकूच्या बियांचे तेल केस वाढीसाठी फायदेशीर ठरते. या फळामध्ये १४ टक्के शर्करा असते तसेच यामध्ये फॉस्फरस आणि लोह जास्त प्रमाणात असते जे हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. चिकूमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते. चिकूची साल तापनाशक आहे. कारण याच्या सालीमध्ये टॅनिन असते.  पालघर तालुक्यातील डहाणू गावाचे मूळ नाव हे “धेनू ग्राम’’ (गाईंचे गाव) असे होते. सुरुवातीच्या काळात डहाणू हे गुलाबाची फुले, नारळ यासाठी प्रसिद्ध होते. इतकेच नव्हे तर रिलायन्स एनर्जीलाही इथून २x२५० मेगावॅट वीजपुरवठा केला जातो.

 

डहाणू आणि घोलवडच्या चिकूची वैशिष्टये ः

z हे फळ फिकट चॉकलेटी रंगाचे असून ते साधारणपणे ४.६ सेंमीचे आसून त्याचे वजन हे ८० ग्रॅमच्या जवळपास असते.

z हे फळ नरम असून चवीला अतिशय गोड असते.

z या झाडाची उंची १४ मीटरपर्यंत असते. तर एका झाडाला २००० च्या आसपास फळे असतात.

z वर्षभरात या भागात ४०० ते ५०० टन फलोत्पादन होते.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या