मुंबईत दहीहंडीची धूम; 51 गोविंदा जखमी

721

मुंबईतील गोविंदा पथकांतील एकूण 51 गोविंदा शनिवारी दहीहंडी फोडताना जखमी झाले आहेत. जखमी गोविंदांपैकी 24 गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या गोविंदांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत 27 गोविंदांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईत विविध ठिकाणी दही हंडी फोडताना जखमी झाल्यानंतर गोविंदाना पालिका तसेच सार्वजनिक रुग्णालयामध्ये नेण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण 51 गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यात 24 गोविंदावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नायर रुग्णालयामध्ये 6, केईएम रुग्णालयामध्ये 12, सायन रुग्णालयामध्ये 4, जेजे रुग्णालयामध्ये 1, जसलोक रुग्णालयामध्ये 1, गोवंडीतील शताब्दी रुग्णालयामध्ये 2, एमटी अग्रवाल रुग्णालयामध्ये 1, राजावाडी रुग्णालयामध्ये 10, कूपर रुग्णालयामध्ये 4, ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये 3, व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये 1, कांदिवली शताब्दी रुग्णालयामध्ये 6 जखमी गोविंदाना दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या