गोविंदा पथके रचणार आरोग्य शिबिरांचे थर, समन्वय समितीचे मंडळांना आवाहन

381

मुंबईसह राज्यात यंदा कोरोनामुळे दहीहंडीचा उत्सव रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दहीहंडी समन्वय समितीने घेतला आहे. उत्सव रद्द झाला असला तरी राज्याची गरज लक्षात घेता यंदा मुंबईसह महाराष्ट्रातील गोविंदा पथके आरोग्य शिबिरांचे थर रचणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दहीहंडी समन्वय समितीने यासंदर्भातील घोषणा केली असून समन्वय समितीच्या या निर्णयाला अनेक मंडळांनी सकारात्मक पाठिंबा दर्शविला आहे.

मुंबईसह राज्यात दरकर्षी दहीहंडी हा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे या सणावर विरजण पडले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची पूर्तता करत दहीहंडी साजरी करणे शक्य नसल्याने दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय समन्वय समितीने जाहीर केले होते.  तर श्रीकृष्ण जन्मोत्सक साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले होते. समन्वय समितीच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता समन्वय समितीने गोविंदा पथकांना एक नके आवाहन केले असून गोविंदा पथकांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्सव काळात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आयोजन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत दहीहंडी समन्वय समितींनी मुंबईसह महाराष्ट्रातील गोविंदा पथकांना येत्या काळात आरोग्य शिबीर आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. ज्यास मुंबईतील अनेक मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना समन्वय समितीचे अरुण पाटील म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीकर उद्भवलेल्या ’रक्ततुटवडा’ या सामाजिक समस्येचा विचार करीत गोविंदा मंडळांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ’महारक्तदान’ शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय इतर समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात यावे असे आम्ही गोविंदा पथकांना सांगितले आहे. तर ज्यासाठी गोविंदा आयोजकांनीदेखील पथकांना मदत करण्याचे आवाहन आम्ही यानिमित्ताने केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर दहिहंडी समन्वय समितीचे विशेष समन्वयक यांच्या तुकड्या या कार्याची आखणी आणि पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

महापालिका शाळांमध्ये राबविणार रक्तदान शिबीर

गोविंदा पथकांना त्यांच्या त्यांच्या जवळच्या महापालिका शाळांमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे. यासाठी महापालिका शाळा उपल्बध करुन द्यावेत, अशी मागणी समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या