दहिसरमध्ये चरस तर मानखुर्दमध्ये एमडीचा साठा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

crime

मुंबई गुन्हे शाखेच्या दोन युनिटने  अमंली पदार्थ विरोधात धडक कारवाई केली.युनीट-12 च्या पथकाने तिघा तस्करांना रंगेहात पकडून दीड कोटी वैंमतीचा  पाच किलो चरसचा साठा हस्तगत केला. तर युनिट-7 च्या पथकाने एका नायजेरियन ड्रग्ज माफियाला पकडून एक लाख 40 हजार किमतीचा एमडीचा साठा जप्त केला.

युनिट-12 चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक गस्त घालत असताना दहिसर पुर्वेकडे तीन इसम एकमेकांना काही तरी देवाण घेवाण करताना त्यांच्या निदर्शनास पडले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून त्या तिघांनाही पकडले. त्यांची अंगझडती घेतली असता एकाकडील सॅक बॅगेत तीन किलो चरस तर अन्य दोघांकडे प्रत्येकी एक किलो अशाप्रकारे एवैण पाच किलो चरस साठा मिळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे या जप्त चरसची वैंमत एक कोटी 60 लाख इतकी असल्याचे उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. जिकरुल्ला आलम अफरोज शेख, इकलाख अब्बास शेख आणि शमशाद शेख अशी त्या ड्रग्ज तस्करांची नावे आहेत. जिकरुल्ला हा बिहारचा असून उर्वरित दोघे पालघर येथे राहतात. चरस नशेबाजांपर्यंत पोहचण्याआधीच युनिट-12 ने तो पकडला.

दरम्यान, युनिट-7 चे प्रभारी निरीक्षक मनिष श्रीधनकर व त्यांच्या पथकाने शीव-पनवेल मार्गावरील मानखुर्द येथे एका नायजेरियन ड्रग्ज माफियाला 70 ग्रॅम एमडीसह रंगेहात पकडले. एक नायजेरियन तस्कर मानखुर्द येथे एमडी विकायला येणार असल्याची खबर श्रीधनकर यांना मिळाली होती. त्यानुसार युनिट-7 च्या पथकाने कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या