Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’14 नोव्हेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Monday, November 14, 2022)

आराम करण्यासाठी वेळ काढाल. शरीराला तेलाने मसाज करा. पैसे खर्च करताना काटकसर करा. मुलांसोबत वेळ घालवा. सहल समाधानकारक होईल. जोडीदारासोबत सायंकाळी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. एखाद्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करण्यासाठी वेळ मिळेल. नखांची काळजी घ्या.
शुभरंग : चॉकलेटी

वृषभ (TAURUS – Monday, November 14, 2022)
आहारात तुपाचा समावेश करा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधाल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. व्यवसाय करणाऱ्यांना आनंदाचे दिवस आहेत. समारंभाला हजेरी लावाल. कार्यालयात तुमचा प्रभाव पडेल. धार्मिक कार्यात दानधर्म करा.
शुभरंग : राखाडी

मिथुन (GEMINI – Monday, November 14, 2022)
अपंगांना मदत करा. तुमच्या पालकांकडून जोडीदाराला सुंदर भेटवस्तू मिळेल. पैसे कमवण्यासाठी तुमच्याजवळील नाविन्यपूर्ण संकल्पना वापरा. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे उत्साही व्हाल. आज चांगली घटना कळेल. अनावश्यक बोलण्यात वेळ वाया घालवू नका. घरातील लहान मुलांना गोडधोड खाऊ घाला.
शुभरंग : पोपटी

कर्क (CANCER – Monday, November 14, 2022)
कढी-भात अन्नदान करा. मित्रमंडळींसोबत विरंगुळा होईल. कामाचे काळजीपूर्वक नियोजन करा. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमाने माफ करा. कोणालाही शब्द देण्यापूर्वी अंतर्मनाचा आवाज ऐका. जे इतरांना मदत करतात, त्यांना देवही मदत करतो, हे विसरू नका. अनावश्यक वेळ वाया घालवू नका. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल.
शुभरंग : निळा

सिंह (LEO – Monday, November 14, 2022)
मित्रांचा आधार मिळेल. नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तिसोबत मिळून व्यवसाय कराल. आर्थिक नुकसान होण्याआधीच सावध राहा. जोडीदाराला वेळ द्या. महत्त्वाच्या व्यक्तिशी संपर्क साधून चर्चा कराल. स्वत:साठी वेळ काढाल. आवडत्या व्यक्तिसोबत वेळ घालवाल. मनातले गुपित योग्य व्यक्तिकडेच बोला. घराच्या आवारात एखादे रोपटे लावून त्याची काळजी घ्या.
शुभरंग : नारिंगी

कन्या (VIRGO – Monday, November 14, 2022)
उगवत्या सूर्याचे दर्शन घ्या. कलात्मक छंद जोपासा. पैशाची कमतरता भासू शकते. घरात कलह होऊ देऊ नका. वास्तूची मिठाने दृष्ट काढा. जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण करण्याची खात्री नसेल तोपर्यंत वचन देऊ नका. आजचा दिवस प्रसन्नदायी असेल. प्रसन्न राहाल. मनाला आनंद देणाऱ्या कार्यात सहभागी व्हाल.
शुभरंग : केशरी

तूळ (TULA- Monday, November 14, 2022)
तुमचे हास्य हा नैराश्य घालवण्यासाठी उत्तम उपाय आहे. व्यर्थ खर्च करू नका. मोकळा वेळ लहान मुलांच्या सहवासात घालवा. नवे तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर कराल. बदलत्या काळाशी जुळवून घ्या. आपले आवडते काम कराल. सकारात्मक राहा. घरात एखादे शुभकार्य घडेल. प्रिय व्यक्तिशी शालीनतेने वागा.
शुभरंग : लाल

वृश्चिक ( SCORPIO – Monday, November 14, 2022)
रामरक्षा म्हणा. पाठ नसेल तर म्हणा. आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. तुमच्या समस्यांचा सामना तुम्हालाच करावा लागेल. वेळेची किंमत समजा. ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत, अशा लोकांसोबत राहू नका. जोडीदारासोबत सायंकाळ चांगली घालवाल. नोकरीतील बदल सकारात्मक असतील. कुटुंबियांना त्यांच्या गरजेच्या वस्तू आणून द्या. गरजेपेक्षा जास्त पैसे कमवू शकाल.
शुभरंग : पिवळा

धनु (SAGITTARIUS – Monday, November 14, 2022)
वाहत्या पाण्यात चुरमुरे प्रवाहित करा. विनाकारण पैसे खर्च करत असाल, तर त्यावर वेळीच नियंत्रण ठेवा. जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी प्रिय व्यक्तिची मदत होईल. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वत: प्रयत्न कराल. महत्त्वाच्या व्यक्तिंशी चर्चा करताना सजग राहा. स्वत:तील कला-कौशल्य ओळखून त्याची जोपासना करा. स्वत:साठी वेळ काढा. आजचा दिवस उत्तम आहे.
शुभरंग : नारिंगी

मकर ( CAPRICORN – Monday, November 14, 2022)
मारुतीरायाला शेंदूर वाहा. आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घाला. स्वत:साठी वेळ काढाल. जोडीदार पुन्हा एकदा नव्याने तुमच्या प्रेमात पडेल. आजारी नातेवाईकांची भेट घ्याल. दृढ निश्चय केलात तरच ध्येय गाठू शकाल. छोट्या-मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका.
शुभरंग : राखाडी

कुंभ (AQUARIUS – Monday, November 14, 2022)
व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांकरिता समाधानकारक फळ मिळेल. आरोग्य चांगले राहिल. मित्रांसोबत वेळ घालवाल. इतरांवर प्रभाव पडेल. नात्यातल्या सगळ्या तक्रारी निघून जातील. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक कार्यासाठी आर्थिक साहाय्य करा.
शुभरंग : चिंतामणी

मीन (PISCES – Monday, November 14, 2022)
कोणत्याही धार्मिक कार्याकरिता यथाशक्ती दान करा. आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. स्वत:च्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. काहीतरी खास योजना आखाल. लोकं कौतुक करतील. जोडीदाराकडून आवडती वस्तू मिळेल. गुरुचरित्र वाचा.
शुभरंग : पांढरा