Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’16 नोव्हेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesay, November 16, 2022)

नेत्रहीन व्यक्तिंना मदत करा. ताणतणावावर मात करू शकाल. घरात सुख-समृद्धी आणि शांतता नांदेल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. गुंतवणुकीच्या योजना फलदायी ठरतील.
शुभरंग : हिरवा

वृषभ (TAURUS – Wednesay, November 16, 2022)
अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घाला. उंबरठ्यावर हळदीचे स्वस्तिक काढा. घरातील लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात रमाल. नवीन पुस्तकांची खरेदी कराल. एकांतात आवडीचे पुस्तक वाचण्यात वेळ घालवाल.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Wednesay, November 16, 2022)
गायींना हिरवा चारा खाऊ घाला. इतरांच्या आवडी-निवडी आणि गरजांचा विचार करा. प्रलंबित कामे पूर्ण कराल. धन लाभाची शक्यता आहे. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मनातलं प्रेम व्यक्त करायला शिका.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Wednesay, November 16, 2022)
घरातील आजी-आजोबांचे आशीर्वाद घ्या. पैसे काटकसरीने खर्च करावे लागतील. सतर्क राहा. मुलांचा गृहपाठ पूर्ण करून घ्याल. आजचा दिवस कामात जाईल. टीव्हीवर सिनेमा पाहण्यात वेळ जाईल. घरातील वातावरण सुखदायी असेल. मन प्रसन्न राहील अशा कृती करा.
शुभरंग : केशरी

सिंह (LEO – Wednesay, November 16, 2022)
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सुंदर दिवस आहे. देवळात मधाचे दान करा. मनातील नकारात्मक विचार झटकून टाका. मानसिक ताणतणावापासून दूर राहा. घरातील लहान भावंडं सल्ला मागतील. स्वत:साठी वेळ काढा. प्रत्येक काम उद्यावर ढकलण्याची सवय सोडून द्या.
शुभरंग : चॉकलेटी

कन्या (VIRGO – Wednesay, November 16, 2022)
अन्नदान करा. कामाच्या ठिकाणी कोणाचाही द्वेष करू नका. कुटुंबिय आणि मित्रमंडळी यांच्या आनंदी आणि दु:खद प्रसंगात सामील व्हा. मिळालेला रिकामा वेळ संगीत ऐकण्यात आणि आवडते पुस्तक वाचण्यात घालवा. कार्यक्षमता वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करा. अंघोळीनंतर कपाळावर टिळा लावा. देवाला नमस्कार करूनच घराबाहेर पडा.
शुभरंग : पांढरा

तूळ (TULA – Wednesay, November 16, 2022)
कामात व्यस्त असलात तरी विश्रांती घेण्यासाठी वेळ काढा. अनपेक्षितपणे घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होईल. लोकांसोबत वाद घालू नका. मारुतीचे दर्शन घ्या. मनातले गुपित योग्य व्यक्तिलाच सांगा. रात्रीचे जागरण करणे टाळा.
शुभरंग : जांभळा

वृश्चिक ( SCORPIO – Wednesay, November 16, 2022)
तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित होतील. जोडीदाराकडून उगाचच अनावश्यक अपेक्षा करू नका. तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकांना भेटायला जा. शंकराचे दर्शन घ्या.
शुभरंग : खाकी

धनु (SAGITTARIUS – Wednesay, November 16, 2022)
घरातील भावंडांसाठी कपडे घ्या. घरात खेळीमेळीचे वातावरण असेल. शेजाऱ्यांशी भांडण करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. नव्या कल्पना अंमलात आणण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. खूप विचार करू नका. कुटुंबात सुख-शांती नांदेल. सायंकाळी लोभाण धुपात कडुलिंबाचा पाला घालून घरात धूप दाखवा.
शुभरंग : नारिंगी

मकर ( CAPRICORN – Wednesay, November 16, 2022)
आजचा दिवस उत्साही असेल. आवडत्या दागिन्याची खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. मोकळ्या हवेत फिरायला जाल. मनाविरुद्ध प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठ तुमचे मत विचारात घेतील. घरात वादविवाद होऊ देऊ नका. सामंजस्याने सगळं मिटवायला शिका. सायंकाळी लवकर घरी जाल.
शुभरंग : चिंतामणी

कुंभ (AQUARIUS – Wednesay, November 16, 2022)
पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. मनात वैरभाव ठेवू नका. रिकाम्या वेळेत पूर्ण करायची राहून गेलेली कामे उरकून घ्या. समाधानी राहा. दत्त महाराजांचे दर्शन घ्या. देवळात प्रसाद वाटा. मन:शांतीसाठी ध्यानधारणा करा. पूर्वी केलेल्या चुकांमध्ये सुधारणा करून आनंदी राहा. कार्यालयात जाताना आवडता पोषाख परिधान करा.
शुभरंग : मोरपिसी

मीन (PISCES – Wednesay, November 16, 2022)
आज तुम्हाला घरी बसून आराम करावासा वाटेल. चंदनाचा टिळा कपाळाला लावा. दिनक्रम व्यस्त राहिल. घरात शुभकार्य घडेल. व्यर्थ खर्च करू नका. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटा. कामाच्या ठिकाणी एखादी छान ट्रिट मिळण्याची शक्यता आहे. नवीन उपक्रमात स्वत:ला गुंतवून घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
शुभरंग : लाल