Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘19 सप्टेंबर’चे राशीभविष्य

 

मेष (ARIES – Monday, September 19, 2022)
विद्यार्थ्यांनी सरावावर भर द्यावा. घरातील वाद घरातच मिटवा. रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. मनातली घुसमट दूर करण्यासाठी कोणाकडे तरी मन मोकळे करा. आर्थिक व्यवहार जपून करा. लगेच कोणावर विश्वास ठेवू नका.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Monday, September 19, 2022)
कर्तव्ये प्राधान्याने पूर्ण कराल. कोणाशीही वादविवाद घालत बसू नका. विचार कृतीत आणाल. अनुभवी व्यक्तिंचा आदर करा. धार्मिक कार्याकरिता अन्नदान करा. घेतलेली उधार ठरलेल्या वेळेत परत करा.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Monday, September 19, 2022)
कामाचे नियोजन करा. घरात आनंदाचे वातावरण असेल. नव्या पोषाखाची खरेदी कराल. बोलताना दुसऱ्याच्या मनाला त्रास होईल असे बोलू नका. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. कलेतील कौशल्य मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवा.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER – Monday, September 19, 2022)
सकारात्मक विचारांची गरज आहे. कारण काहीही असो शांत राहण्याचा प्रयत्न कराल. देवदर्शनाला जाण्याचा विचार कराल. प्रवासात मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी लागेल. जोडीदाराने केलेल्या कामाचे कौतुक करा. आवडत्या विषयाचे वाचन करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : पिवळा

सिंह (LEO – Monday, September 19, 2022)
आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. दररोज सकाळी व्यायाम करायला प्राधान्य द्या. प्रेमाच्या माणसांशी तुटकपणे वागू नका. जोडीदाराशी सुसंवाद साधा. घरातील वयोवृद्धांची काळजी घ्या. पैशाचे नीट नियोजन करा. अनावश्यक उलाढाल
शुभरंग : केशरी

कन्या (VIRGO – Monday, September 19, 2022)
देण्याघेण्याचे व्यवहार मार्गी लावाल. आजचा दिवस निवांत जाईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. जोडीदाराला वेळ देता येईल. मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : चंदेरी

तूळ (TULA- Monday, September 19, 2022)
खाण्यापिण्याची पथ्ये पाळावी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाचल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांवर सही करू नका. घरातील लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तिंचा मान राखा.
शुभरंग : जांभळा

वृश्चिक ( SCORPIO – Monday, September 19, 2022)
सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन ओळखी होतील. समतोल आहार घ्या. तारतम्याने निर्णय घ्यावे लागतील. कोणाशीही अनावश्यक वाद घालत बसू नका. अति गोड पदार्थ खाऊ नका. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल.
शुभरंग : खाकी

धनु (SAGITTARIUS – Monday, September 19, 2022)
आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. टंगळमंगळ करू नका. अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करा. मन मारून राहू नका. प्रिय व्यक्तिबद्दल मनात शंका घेऊ नका. जोडीदाराच्या मनोकामना पूर्ण करण्याकडे कल असेल.
शुभरंग : राखाडी

मकर ( CAPRICORN – Monday, September 19, 2022)
आत्मविश्वास वाढेल. आवडीच्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा होईल. वडीलधाऱ्या व्यक्तिंचा मान राखा. मनातील नकारात्मक विचार टाळा. वाणसामानाच्या खरेदीसाठी आज वेळ काढाल. कोणाशीही तुटक वागू नका.
शुभरंग : मोती

कुंभ (AQUARIUS – Monday, September 19, 2022)
स्वत:साठी थोडा तरी वेळ काढाल. आरोग्याच्या संवर्धनासाठी व्यायामाला वेळ द्याल. वरिष्ठांना न दुखवता आपले मत मांडा. घरातील वाद घरातच सोडवा. अडचणीवर तोडगा काढाल. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : नारिंगी

मीन (PISCES – Monday, September 19, 2022)
कुटुंबियांना वेळ देण्याची आवश्यकता आहे. बुद्धिला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका. माणसांची पारख करून आर्थिक व्यवहार करा. चुकीचे निर्णय घेऊ नका. आराध्यदेवतेचे दर्शन घेऊन प्रार्थना करा. उगाचच वेळ वाया घालवू नका. आवडता पोषाख परिधान करा.
शुभरंग : मोरपिसी