Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘2 डिसेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, December 2, 2022)

घरातील सदस्यांसोबत वाद घालू नका. दिलेला शब्द पाळाल. आर्थिक व्यवहार करताना जोखीम स्वीकारू नका. पैशाचा काटकसरीने वापर करा. लहान मुलांचा अभ्यास घ्या. प्रवासात सामानाची योग्य ती काळजी घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील.
शुभरंग : मोती

वृषभ (TAURUS – Friday, December 2, 2022)
रागावर वेळीच नियंत्रण ठेवा. मनातील नकारात्मक विचारांना दूर ठेवा. अनावश्यक कामे करण्यात वेळ वाया घालवू नका. भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्याल. शक्यतो कोणाला उधार देऊ नका. इतरांच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकण्यात पुढाकार घ्याल.
शुभरंग : हिरवा

मिथुन (GEMINI – Friday, December 2, 2022)
कोणाच्याही अमिषाला भुलू नका. जवळचे प्रवसयोग संभवतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. वाद टाळा. घरातील थोरामोठ्यांची मदत घ्याल. आहारविहाराचे नियम पाळा. प्रकृतीची काळजी घ्या. स्वास्थ्य जपा.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Friday, December 2, 2022)
प्रवासाचा योग आहे. सकस आणि ताजे अन्न सेवन करा. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न कराल. ताणतणावांना दूर ठेवाल. नातेवाईकांमधील गैरसमजांपासून दूर राहा. घरात शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. जनसंपर्कात वाढ होईल.
शुभरंग : पोपटी

सिंह (LEO – Friday, December 2, 2022)
राहती जागा बदलण्याचा योग आहे. आपल्या कार्याची गुप्तता पाळा. शासकीय नियम सांभाळावे. आवडत्या व्यक्तीची बेट होईल. निर्णय घेण्याआधी घरातील मोठ्या व्यक्तिचे मत विचारात घ्या. कोणावरही विश्वास ठेवू नका. आशावादी राहाल.
शुभरंग : राखाडी

कन्या (VIRGO – Friday, December 2, 2022)
काही आल्हाददायक क्षण अनुभवाल. कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. कठीण परिस्थितीवर नियंत्रण ठेवाल. आवडती गाणी ऐकण्यासाठी निवांत वेळ काढा. आत्मचिंतन कराल. सहकाऱ्यांवर विश्वास ठेवा.
शुभरंग : पोपटी

तूळ (TULA- Friday, December 2, 2022)
अति मागे वळून पाहू नका. योजलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. अचानक येणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्वत:च्या स्वभावाचे नीट परीक्षण कराल. आश्वासन देताना विचार कराल.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, December 2, 2022)
आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. स्वत:चे म्हणणे इतरांवर लादू नका. घराचे नूतनीकरण कराल. वयोवृद्ध व्यक्तिंचा अपमान करू नका. पैसे सुरक्षित स्थळी ठेवा. नोकरी-व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पिवळा

धनु (SAGITTARIUS – Friday, December 2, 2022)
स्वत:जवळील कौशल्याचा वापर कराल. भूतकाळाचा विचार करू नका. भावना आणि कर्तव्य यांचा मेळ घालाल. स्वत:चे म्हणणे खरे करण्यापेक्षा शांत राहा. जोखमीच्या ठिकाणी काळजीपूर्वक कामे करा. इतरांच्या भावनांची कदर कराल.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN – Friday, December 2, 2022)
विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. अपरिचित व्यक्तिवर विश्वास ठेवू नका. प्रिय व्यक्तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा. मैत्रिणीला अबोलीचा गजरा भेट म्हणून द्याल.
शुभरंग : मोरपिसी

कुंभ (AQUARIUS – Friday, December 2, 2022)
एखादा चांगला मित्र जोडून ठेवा. वजन नियंत्रणात ठेवा. इतरांचे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. लेखन कौशल्यात वाढ होईल. वेळेचा सदुपयोग करा. उगाच कोणावर राग काढू नका. अचानक प्रवास होतील.
शुभरंग : मोती

मीन (PISCES – Friday, December 2, 2022)
सर्वांकडून मदतीचा हात मिळेल. पिंपळाच्या झाडावरजवळ साखर ठेवा. आराध्यदेवतेची उपासना कराल. घरातील तुटलेल्या, अनावश्यक वस्तू घरात ठेवू नका. कुमारिकांना फुले द्या. मौल्यवान वस्तुंची खरेदी कराल.
शुभरंग : सोनेरी