
मेष (ARIES – Monday, June 20, 2022)
व्यवसायात यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढाल. आरोग्य चांगले राहिल. ओळखीच्या लोकांमधून उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. कार्यालयातून लवकर घरी जाल. एखादी आश्चर्यचकित करणारी घटना घडण्याची शक्यता आहे.
शुभरंग : हिरवा
वृषभ (TAURUS – Monday, June 20, 2022)
कोळशाचे आठ तुकडे वाहत्या पाण्यात विसर्जित करा. इतरांच्या आनंदात स्वत:चा आनंद माना. उधार दिलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. घरातील सामान जागच्या जागी लावा. बालपणीच्या आठवणीत रमून जाल.
शुभरंग : पोपटी
मिथुन (GEMINI – Monday, June 20, 2022)
घरात लोबान धूप करा. उत्तम आरोग्याकरिता सकाळी चालायला जा. जुनी मैत्रिण बऱ्याच वर्षांनी अचानक भेटण्याचा योग आहे. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. हरवलेली मौल्यवान वस्तू सापडल्याने खूश व्हाल. जोडीदारासोबत प्रेमाचे भांडण होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : काळा
कर्क (CANCER – Monday, June 20, 2022)
सोमवारी शंकराच्या पिंडीवर दुध-पाण्याचा अभिषेक करा. गरजवंताला अक्कल नसते हे लक्षात घ्या. सामाजिक कार्यात भाग घ्याल. स्वत:साठी वेळ काढाल. प्रिय व्यक्तिवर बराच काळ रुसून राहू नका. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल.
शुभरंग : चंदेरी
सिंह (LEO – Monday, June 20, 2022)
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. जागरुक राहा. तणाव आणि चिंतेपासून दूर राहण्याकरिता प्रयत्न करावे लागतील. घरातील लहान मुलांकरिता वेळ काढाल. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा एखादे आवडीचे पुस्तक पाहण्यात वेळ घालवाल. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : खाकी
कन्या (VIRGO – Monday, June 20, 2022)
मारुतीच्या देवळात नारळ वाढवा. आज तुम्हाला विश्रांती घेण्याची आवश्यकता भासू शकते. सायंकाळी प्रिय व्यक्तिची भेट होईल. घरात एखादा समारंभ साजरा होण्याची शक्यता आहे. मिळालेली संधी सोडू नका.
शुभरंग : पोपटी
तूळ (TULA- Monday, June 20, 2022)
सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा. वादविवाद घालू नका. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. सहकारी तुमचे कौतुक करतील. येणाऱ्या अडचणींचा सामना कराल. घरात सुगंधी अत्तर शिंपडा.
शुभरंग : लाल
वृश्चिक ( SCORPIO – Monday, June 20, 2022)
नोकरी व्यवसायात सफलता प्राप्त होईल. कार्यालयीन कामाबाबत सावध राहाल. मिळालेल्या सुटीचा फायदा घ्याल. कौटुंबिक जीवनात आनंदी राहाल. एखादी महत्त्वाची बातमी कानी येण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा माराल.
शुभरंग : केशरी
धनु (SAGITTARIUS – Monday, June 20, 2022)
अति मांसाहार टाळा. व्यर्थ पैसे खर्च करू नका. कार्यालयीन क्षमता वाढेल. स्वत:साठी वेळ काढाल. अडलेली कामे पूर्ण कराल. घरातील फुलदाणीत गुलाबाची फुले ठेवा. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. आजचा दिवस आरामात घालवाल. कुमारिकेला मोगऱ्याचा गजरा द्या.
शुभरंग : पांढरा
मकर ( CAPRICORN – Monday, June 20, 2022)
मारुतीच्या मंदिरात दर्शनासाठी जाल. बऱ्याच वर्षांनी आपल्याला प्रिय असणाऱ्या नातेवाईकांची भेट होईल. वरिष्ठ आज आपल्या कामाचे कौतुक करतील. कोणाविषयीही पूर्वग्रह ठेवू नका. आजचा दिवस आपल्या मंगलमय आहे. मदत करणाऱ्याप्रती कृतज्ञ राहा. दुर्गासप्तशतीचा पाठ करा.
शुभरंग : किरमिजी
कुंभ (AQUARIUS – Monday, June 20, 2022)
पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला. जोडीदारावर नाराज होऊ नका. घरातील सदस्यांना समजून घ्या. नवे कपडे परिधान करा. नव्या व्यक्तिंशी ओळख होईल. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यात विनाकारण वेळ वाया घालवू नका.
शुभरंग : मोती
मीन (PISCES – Monday, June 20, 2022)
दररोज दूध किंवा दह्याचे सेवन करा. मित्रांना दुखवू नका. नवे आर्थिक करार होण्याची शक्यता आहे. मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तिच्या भावना समजून घ्या. समाजात नवीन ओळख मिळेल. नव्या पुस्तकांची खरेदी करून वाचून काढाल. जोडीदारासोबत जुन्या आठवणीत रमून जाल.
शुभरंग : चंदेरी