Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘20 सप्टेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Tuesday, September 20, 2022)
ताणतणावावर मात करू शकाल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरातील लहान मुलांना वेळ द्याल. तुम्ही केलेल्या कामाला दाद मिळेल. जोडीदाराकडून मौल्यवान भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मिळालेला रिकामा वेळ वाया घालवू नका. देवीच्या देवळात प्रसादाचे वाटप करा.
शुभरंग : जांभळा

वृषभ (TAURUS – Tuesday, September 20, 2022)
जेवताना तांब्याच्या चमच्याचा उपयोग करा. घरातील मोठ्या व्यक्तिंचे आशीर्वाद घ्या. कोणाकडूनही विनाकारण अपेक्षा ठेवू नका. कार्यालयात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. दररोज सकाळी तुळशीला पाणी घाला. अनावश्यक पैसे खर्च करू नका.
शुभरंग : केशरी

मिथुन (GEMINI – Tuesday, September 20, 2022)
मानसिक शांतता मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विनाकारण चिंता करू नका. आवडती कला जोपासण्याचा प्रयत्न कराल. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढावा लागेल. झोपण्याकरिता चटईचा वापर करा. सौंदर्याची काळजी घ्या.
शुभरंग : नारिंगी

कर्क (CANCER – Tuesday, September 20, 2022)
भूतकाळातील घटनांचा विचार करत बसू नका. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. कार्यालयात नव्या ओळखी होतील. स्वत:ला आवडीच्या कामात गुंतवून घ्याल. सायंकाळी जोडीदारासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल. कोणाशीही वाद घालू नका.
शुभरंग : पिवळा

सिंह (LEO – Tuesday, September 20, 2022)
अन्नदान करा. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. दुसऱ्यांच्या दडपणाखाली वावरू नका. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे. आज स्वत:साठी निवांत वेळ काढाल. आजचा दिवस आपल्यासाठी प्रसन्नदायी असेल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : सोनेरी

कन्या (VIRGO – Tuesday, September 20, 2022)
आराध्यदेवतेची उपासना कराल. वाद, संघर्ष टाळा. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मनातील अनावश्यक विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यानधारणा करा. काचेच्या बाटलीतील पाणी प्या. कलेतील कौशल्य वाढीस लावण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : निळा

तूळ (TULA- Tuesday, September 20, 2022)
तांब्याचे नाणे खिशात ठेवा. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. दिवसाच्या सुरुवातील थोडी मरगळ आल्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे. स्वत:साठी वेळ काढाल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. नव्या नोकरीत अर्ज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
शुभरंग : पांढरा

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, September 20, 2022)
रोजच्या आहारात हिरव्या चण्यांचा समावेश करा. प्रवासात महत्त्वाच्या व्यक्तिंची काळजी घ्या. मनाला शांती मिळेल. मेहनतीला यश मिळेल. दररोज सकाळी सूर्यनमस्कार घाला. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – Tuesday, September 20, 2022)
जोडीदाराकडून समाधानकारक वागणूक मिळेल. कुटुंबासाठी मेहनत करावी लागेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. अनुभवी लोकांसोबत व्यवसायाची बोलणी होतील. कामाचे कौतुक होईल. वेळेचा सदुपयोग कराल. कोणाचाही मत्सर करू नका.
शुभरंग : चॉकलेटी

मकर ( CAPRICORN – Tuesday, September 20, 2022)
नवे करार लाभदायक ठरतील. पैसे गुंतवताना घाईगडबड करू नका. तुमच्या योग्य वेळी मदत करण्याच्या स्वभावामुळे एखाद्याचे नुकसान होणे टळेल. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आवडीच्या फुलझाडाचे रोपटे अंगणात लावा.
शुभरंग : मोती

कुंभ (AQUARIUS – Tuesday, September 20, 2022)
सकाळी हिरव्या गवतावरून चाला. क्षुल्लक वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका. तुमच्या नियमित कष्टांचे चीज होईल. मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवाल. घरातील वातावरण उत्साही असेल. व्यसन टाळा. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Tuesday, September 20, 2022)
एकांतात वेळ घालवाल. इतरांमधील दोष शोधत राहू नका. घरी पाहुणे येतील. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा. कामात केलेला बदल लाभदायक ठरेल. जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल. किरकोळ कारणावरून गैरसमज करून घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या.
शुभरंग : मोरपिसी