Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’21 जानेवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Saturday, January 21, 2023)
दिलेला शब्द पाळाल. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. अवांतर गोष्टींकडे लक्ष देऊन वेळ वाया घालवू नका. कामाचे योग्य नियोजन कराल. निर्णय घेताना अकारण घाई करू नका. स्वत:चे म्हणणे इतरांवर लादू नका. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे.
शुभरंग : लाल

वृषभ (TAURUS – Saturday, January 21, 2023)
नकारात्मक विचार मनात आणू नका. सौंदर्य जपाल. सुचलेल्या युक्तीचा वापर करा. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्याल. आरोग्याची काळजी घ्या. चिडचिड करू नका. नोकरी-व्यवसायात सावधगिरी बाळगा. दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू नका.
शुभरंग : पिवळा

मिथुन (GEMINI – Saturday, January 21, 2023) 

प्रवासाचे योग आहेत. कोणतेही प्रश्न चर्चा करून सोडवाल. काटकसरीने खर्च करावा लागेल. कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. प्रिय व्यक्तिच्या कामाचे कौतुक कराल. रागावर नियंत्रण ठेवा. सरकारी नियमांचे पालन कराल.
शुभरंग : पोपटी

कर्क (CANCER – Saturday, January 21, 2023)
कुटुंबासाठी वेळ द्याल. जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. परिश्रमाशिवाय पर्याय नाही. स्वत:ला सिद्ध करावे लागेल. नोकरीत कोणाशीही वाद घालू नका. वरिष्ठांना विश्वासात घ्याल.
शुभरंग : हिरवा

सिंह (LEO – Saturday, January 21, 2023)
मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. क्षमतेपेक्षा जास्त काम करणे टाळा. कामाच्या नव्या संधी मिळतील. कलेत प्रगती कराल. एकाग्रता साधण्यासाठी अथर्वशीर्षाचे वाचन करा. मनावर संयम ठेवावा लागेल. वेळेचा अपव्यय टाळा. लगेच कोणावर विश्वास ठेवू नका.
शुभरंग : चॉकलेटी

कन्या (VIRGO – Saturday, January 21, 2023)
आनंदाचे क्षण अनुभवाल. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. नोकरी-व्यवसायात प्रगती कराल. वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. गोड बोलून घरातील सर्वांची मने जिंकाल. अभ्यासात सातत्य ठेवा. परिश्रमाचे फळ मिळेल.
शुभरंग : नारिंगी

तूळ (TULA- Saturday, January 21, 2023)
भूतकाळाचा विचार करू नका. वेळ पाळावी लागेल. व्यायामाला प्राधान्य द्या. आहार-विहाराचे नियम पाळा. आजारावर वेळीच औषधोपचार घ्या. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. कोणाविषयीही गैरसमज ठेवू नका. मनात आलेल्या शंकेचे वेळीच निरसन करा.
शुभरंग : मोरपिसी

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, January 21, 2023)
स्वत:चे म्हणणे इतरांवर लादू नका. आत्मविश्वासात वाढ होईल. कलेत प्रगती कराल. प्रयत्नाची कास धरा. कलाकारांना नवीन व्यासपीठ मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्यासाठी वाव मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. बोलण्याने गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या.
शुभरंग : किरमिजी

धनु (SAGITTARIUS – Saturday, January 21, 2023)
वर्तमानकाळात राहा. नवीन जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. दिलेला शब्द पाळाल. राग आणि अति बोलणे आवरा. वैयक्तिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. घरातील वातावरण आनंददायी असेल. सकाळचा वेळ बागकामात घालवा. घरात धूप करा.
शुभरंग : निळा

मकर ( CAPRICORN -Saturday, January 21, 2023)
आराध्य देवतेचे दर्शन घ्या. मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घ्या. पुस्तकांचे वाचन करा. सायंकाळी घरातील गच्चीवर किंवा पार्कमध्ये फिरायला जाल. वाचनालयात वेळ घालवाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल.
शुभरंग : आकाशी

कुंभ (AQUARIUS – Saturday, January 21, 2023)
वजनवाढीवर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. घरातील लहान मुलांना सहलीला नेण्याचे नियोजन करा. सावधपणे स्वत:चे मत मांडा. वरिष्ठांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. नाटक आणि सिनेमा यासारखे मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात रंगून जाल.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Saturday, January 21, 2023)
आपला प्रभाव इतरांवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठांशी मिळतेजुळते घ्याल. कोणाकडून कोणतीच अपेक्षा करू नका. प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळेल. स्वत:साठी वेळ काढाल. घरातील कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष करू नका. भविष्यात साठवलेल्या पैशाचा योग्य विनियोग कराल.
शुभरंग : केशरी