Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘21 सप्टेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesday, September 21, 2022)
कुटुंबातील व्यक्तिंना वेळ द्या. चांगल्या गोष्टी कानावर येतील. मानसिक त्रास करून घेऊ नका. मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने आणि ध्यानधारणा करा. आर्थिक बोलणी सांभाळून करावी लागतील. विश्वसनीय व्यक्तिकडे मन मोकळे करा.
शुभरंग : नारिंगी

वृषभ (TAURUS – Wednesday, September 21, 2022)
खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका. आत्मविश्वास वाढवणारी घटना घडण्याची शक्यता आहे. सरकारी कामात यश मिळण्यासाठी अनुकूल कालावधी लागेल. घराबाहेर जाताना मोठ्या व्यक्तिंचे आशीर्वाद घ्या. आर्थिक प्राप्तीसाठी बुद्धीचा वापर करावा लागेल.
शुभरंग : सोनेरी

मिथुन (GEMINI – Wednesday, September 21, 2022)
वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. घरातील लहान मुलांची विशेष काळजी घ्याल. घरात आनंदाचे वातावरण असेल. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. बोलताना दुसऱ्याच्या मनाला त्रास होईल असे बोलू नका.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Wednesday, September 21, 2022)
मोहाला बळी पडू नका. संधीचं सोनं करण्याच्या तयारीत राहा. प्रवासाचे बेत यशस्वी होतील. अपरिचीत व्यक्तिच्या प्रेमात पडू नका. जोडीदाराच्या कामाचे कौतुक करा. घरातील मोठ्या व्यक्तिंच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : पिवळा

सिंह (LEO – Wednesday, September 21, 2022)
मेहनतील यश मिळेल. प्रिय व्यक्तिशी तुटकपणे वागू नका. जोडीदारासोबत सुसंवाद साधाल. कोणालाही उसने पैसे देताना विचार करा. नियोजन करून पैसे जमा करा. सकाळी सूर्यनमस्कार घाला. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. अडलेली कामे पूर्ण करण्याचा निश्चय करा.
शुभरंग : चंदेरी

कन्या (VIRGO – Wednesday, September 21, 2022)
सर्वांना आपुलकीने मदत करा. जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. नीट शिकायचं असेल तर न कंटाळता प्रयत्न करावे लागतील. जुनी येणी वसूल करण्यासाठी बुद्धिचातुर्याचा वापर करावा लागेल. बोलताना मधुरावाणीचा उपयोग करा. सावधानपूर्वक महत्त्वाचे निर्णय घ्या. आहारात तुपाचा समावेश करा.
शुभरंग : जांभळा

तूळ (TULA- Wednesday, September 21, 2022)
विष्णसहस्त्रनामावलीचे वाचन करा. प्रिय व्यक्तिचा विश्वास संपादन करावा लागेल. आत्मपरिक्षण करा. पथ्यपाणी सांभाळा. इतरांची अतिचिकित्सा करायला जाऊ नका. थोर व्यक्तिंच्या सहवास अनुभवाल. सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पांढरा

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, September 21, 2022)
जबाबदारीकडे दुर्लक्ष करू नका. कर्तृत्वाला वाव मिळेल. अति गोड खाण्याच्या सवयीवर निर्बंध घाला. आहारात फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करा. सर्व गोष्टी नशिबावर अवलंबून असतात, असे म्हणून हात-पाय गाळून बसू नका. घरातील सदस्यांसोबत वाद घालू नका. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढा.
शुभरंग : आकाशी

धनु (SAGITTARIUS – Wednesday, September 21, 2022)
अभ्यासात शॉटकट मारायला जाऊ नका. वरिष्ठांसोबत विनयशीलता जपा. कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणू नका. दुसऱ्याच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण करण्याकडे कल ठेवाल. अभ्यासातील अडचणीत मोठ्यांचे मार्गदर्शन घ्याल. वेळच्या वेळी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. प्रयत्नांची दिशा चुकणार नाही, याची काळजी घ्या.
शुभरंग : राखाडी

मकर ( CAPRICORN – Wednesday, September 21, 2022)
प्रयत्नांच्या बळावर यश मिळेल. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण कराल. घरातील वडीलधाऱ्यांचा मान राखाल. गरजेपेक्षा जास्त वस्तूंची खरेदी करू नका. कामात चालढकलपणा करू नका. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. वडीलधाऱ्या व्यक्तिंचा मान राखा. आवडता पोषाख परिधान कराल.
शुभरंग : मोरपिसी

कुंभ (AQUARIUS – Wednesday, September 21, 2022)
प्रवासात काळजी घ्या. सहलीला जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची संधी मिळेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. स्वत:करिता पुरेसा वेळ काढाल. आरोग्य संवर्धनाकरिता व्यायामाला वेळ द्याल. घरातील अडचणीवर तोडगा काढाल. कार्यालयात स्वत:चे मत इतरांना न दुखावता मांडाल.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Wednesday, September 21, 2022)
सदैव आनंदी आणि उत्साही रहाल. आपल्या विचारांमध्ये सुधारणा करा. कुटुंबाकडून सौख्य लाभण्यासाठी त्यांना वेळ द्या. कामाशिवाय इतर बाबतीत पडू नका. माणसांची योग्य पारख करूनच त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करावा लागेल. बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका. चुकीचे निर्णय घेऊ नका.
शुभरंग : हिरवा