Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘22 सप्टेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, September 22, 2022)
खरेदीसाठी वेळ काढाल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. कलेत मन रमवाल. आर्थिक व्यवहार जपून करावा लागेल. सकाळी योगासने, ध्यानधारणा करण्यावर भर द्याल. लगेचच कोणावर विश्वास ठेवू नका. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : केशरी

वृषभ (TAURUS – Thursday, September 22, 2022)
भविष्यातील आर्थिक नियोजन गुंतवणूक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करा. घरातील मोठ्या व्यक्तिंच्या बाबतीत कर्तव्य पालनात कसूर ठेवू नका. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. घराबाहेर पडताना आईवडिलांचे आशीर्वाद घ्या. पारिजातकाच्या वृक्षाला पाणी घाला आणि मनातली इच्छा व्यक्त करा.
शुभरंग : हिरवा

मिथुन (GEMINI – Thursday, September 22, 2022)
गाईला चारा खाऊ घाला. आपल्या मनातील इच्छा योग्य व्यक्तिकडे व्यक्त कराल. कोणत्याही कामात अतिघाई करू नका. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. पितृपक्षात दानधर्मे करून पितरांचे आशीर्वाद मिळवा. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. जमिनीवर झोपा. वेळ पाळावी लागेल.
शुभरंग : जांभळा

कर्क (CANCER – Thursday, September 22, 2022)
महिलांनी केसात गजरा माळा. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. जोडीदासाठी वेळ काढाल. आळस झटकून कामाला लागाल. राहून गेलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न कराल. आपल्या वर्तनाला महत्त्व द्या. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मनोराज्यात रमू नका. मनातील अतिविचारांना आळा घालण्यासाठी ध्यानधारणेचा मार्ग अवलंबा. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान कराल.
शुभरंग : पिवळा

सिंह (LEO – Thursday, September 22, 2022)
केशरी रंगाचे वस्त्र परिधान करा. कोणाकडेही नको त्या गोष्टीची चौकशी करू नका. प्रवासाचे बेत आखावेसे वाटतील. इतरांच्या भावनांची कदर करा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. मन मारून जगू नका. आवडत्या गोष्टींचा आस्वाद घ्या. अथर्वशीर्षाचे वाचन करा. देवीच्या देवळात जाऊन दर्शन घ्या.
शुभरंग : लाल

कन्या (VIRGO – Thursday, September 22, 2022)
नवीन जबाबदारी हाती येण्याची शक्यता आहे. चिडचिड करू नका. कोणत्याही कामाचा कंटाळा करून टाळाटाळ करू नका. आज तुम्हाला तुमच्या आवडीचा पदार्थ अनपेक्षितपणे खायला मिळण्याची शक्यता आहे. जुनी देणी देऊन टाकाल. रस्त्यातून चालताना विचार करणे टाळा. सकाळचा वेळ बागकामात घालवाल. जोडीदारासोबत प्रेमाने वागा.
शुभरंग : जांभळा

तूळ (TULA- Thursday, September 22, 2022)
घरात विष्णुसहस्त्रनामावलीचे वाचन करा. आवडते वस्त्र परिधान करा. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. जुने येणे वसूल कराल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. रागावर नियंत्रण ठेवा. एकांतात राहावेसे वाटू लागेल. कोणावरही विश्वास ठेवून कागदपत्रांवर सह्या करू नका. घरातील लहान मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. आपले काम उत्कृष्ट करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.
शुभरंग : पांढरा

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, September 22, 2022)
नोकरीच्या ठिकाणी शिस्तीचे पालन करावे लागेल. आहाराची पथ्ये पाळा. कोणाच्याही खोट्या स्तुतीला बळी पडू नका. तारतम्याने निर्णय घ्यावे लागतील. प्रिय व्यक्ती तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यावी लागेल. ध्यानधारणेसाठी वेळ काढाल. कोणावाचून कोणाचेही अडत नाही, हे लक्षात ठेवा.
शुभरंग : काळा

धनु (SAGITTARIUS – Thursday, September 22, 2022)
कामातील अडचणी वरिष्ठांकडे मांडा. अचूकता साधण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी गोडी-गुलाबीने वागा. एकमेकांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्याकडे कल ठेवाल. अडीअडचणींवर योग्य व्यक्तिकडून मार्गदर्शन घ्याल. घरातील फुलदाणीत पिवळी गुलाबाची फुले ठेवा. कलेतील कौशल्य साध्य करण्याचा प्रयत्न कराल. सूर्याचे दर्शन घ्या.
शुभरंग : आकाशी

मकर ( CAPRICORN – Thursday, September 22, 2022)
कोणावरही रागावू नका. सामाजिक कार्यात भाग घ्याल. सोन्या-चांदिच्या दागिन्यांची खरेदी करावीशी वाटेल. कार्यातील कामात व्यस्त व्हाल. तुमच्यातील प्रामाणिकपण, समर्पण या गुणांचा कामात फायदा होईल. एकाग्रता वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील. अतिबोलण्यापेक्षा कामाला महत्त्व द्याल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.
शुभरंग : पोपटी

कुंभ (AQUARIUS – Thursday, September 22, 2022)
पोटाची काळजी घ्या. आहारात तुपाचा समावेश करा. सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. विश्वसनीय व्यक्तिकडे मन मोकळे कराल. तब्येतीकडे लक्ष द्या. स्वत:साठी वेळ काढाल. आकाशी रंगाचा पोषाख परिधान करा. तुमच्या शांत आणि गंभीर स्वभावाचा तुम्हाला फायदा होईल. आवडत्या झाडाझुडपांची जोपासना कराल. रोजनिशी लिहावीशी वाटण्याची शक्यता आहे.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Thursday, September 22, 2022)
डोळ्यांची काळजी घ्या. घरी एखादा धार्मिक समारंभ साजरा होण्याची शक्यता आहे. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. आहारात फळभाज्यांचा समावेश करा. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. मोत्यांचे दागिने परिधान करा. प्रसन्न राहाल. समाजात तुमचा प्रभाव पडेल. सगळ्यांशी प्रेमाने वागा. आवडत्या पुस्तकाचे वाचन करा.
शुभरंग : हिरवा