Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘23 सप्टेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, September 23, 2022)
नाती जपाल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. आपल्या कामाला भाग्याची साथ मिळेल. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. आवडती कामे करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
शुभरंग : नारिंगी

वृषभ (TAURUS – Friday, September 23, 2022)
आपल्या कामात मित्र सहकार्य करतील. परदेशात कामानिमित्त जाण्याचा योग आहे. आत्मसन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहिल. कोणत्याही गरीब व्यक्तिला पिठाचे दान करा. जांभळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. मनाजोगी खरेदी करण्यासाठी आज वेळ काढाल.
शुभरंग : गुलाबी

मिथुन (GEMINI – Friday, September 23, 2022)
बोलताना विचार करूनच बोला. शिक्षणात प्रगती करण्याचा विचार मनात डोकावण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला घेऊन काम केल्यास लाभ होईल. कोणाला पैसे उधार देऊ नका. गायीला पोळी खाऊ घाला. हलक्या पिवळ्या रंगाचा पोषाख घाला. प्रिय व्यक्तिसाठी सायंकाळी घरी जाताना गजरा घेऊन जा.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER – Friday, September 23, 2022)
नशीब साथ देईल. समजून-उमजून मनात आलेले विचार व्यक्त करा. भाग घेतलेल्या स्पर्धेत यश मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. बेसनचे लाडू वाटा. आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. कलेत कौशल्या प्राप्त करण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : पोपटी

सिंह (LEO – Friday, September 23, 2022)
खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात कोणतीही कृती करू नका. जुने कर्ज चुकवण्यासाठी मदत मिळेल. गरजूला फळवाटप करा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. फुलझाडांची जोपासना कराल. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : हिरवा

कन्या (VIRGO – Friday, September 23, 2022)
नोकरीत प्रगती करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींसोबत संबंध सुधारतील. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. अन्नदान करा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. घरातील रंगरंगोटी, सुशोभिकरणाचे काम हाती घ्याल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : चॉकलेटी

तूळ (TULA- Friday, September 23, 2022)
समाजात मान-सन्मान मिळेल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील. प्रिय व्यक्तिकडून अपेक्षित कामे पूर्ण न होण्याची शक्यता आहे. कोणतेही काम करताना अति उतावीळ होऊ नका. देवळात साखरेचे वाटप करा. कुलदेवतेची उपासना करा. स्वत:साठी वेळ काढा. माणसे ओळखायला शिका.
शुभरंग : बदामी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, September 23, 2022)
धन लाभाचा योग आहे. स्थावर मालमत्तेशी संबंधित कामे करताना निष्काळजीपणा करू नका. करियरमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न कराल. नातेवाईकांच्या सहकार्याने व्यवसायात नव्या संकल्पना राबवाल. गायीला चारा खाऊ घाला. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. सहलीला जाण्याचे बेत आखाल.
शुभरंग : लाल

धनु (SAGITTARIUS – Friday, September 23, 2022)
ध्येयावर लक्ष केंद्रित करा. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. सामाजिक कार्यात भाग घ्याल. गुळाचे दान करा. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. परदेशात जाण्याचे योग आहेत. कोणाशीही पूर्वग्रह ठेवून वागू नका. गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाचे फूल वाहा. घरात गणपती अथर्वशीर्षाचे पारायण करा.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN – Friday, September 23, 2022)
जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. हितशत्रूंपासून सावध राहा. घरातील लहान मुलांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवावे लागेल. दूरच्या नातेवाईकांच्या भेटीगाठीचा योग आहे. वायफळ गप्पा मारण्यात गुंतू नका. गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ व्यक्तिकडूनच मार्गदर्शन घ्या. लहान मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करा.
शुभरंग : जांभळा

कुंभ (AQUARIUS – Friday, September 23, 2022)
खर्चावर नियंत्रण ठेवायला शिका. एखादा मोठा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहिल. देवळात पिवळ्या फळांचे दान करा. जुन्या मैत्रिणीची भेट होईल. नव्या दागिन्यांची खरेदी करण्याची इच्छा होण्याची शक्यता आहे. गरम पाणी प्या. पोटाची काळजी घ्यावी लागेल.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Friday, September 23, 2022)
नवे कार्यक्षेत्र निवडाल. धनलाभाची शक्यता आहे. आळसामुळे महत्त्वाचा वेळ आणि कामाचे नुकसान करून घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. देवळात अन्नदान करा. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान कराल. संधीचे सोने कराल. नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न कराल. कार्यालयातील सहकाऱ्यांना मदत करावी लागण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पिवळा