Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 24जानेवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Tuesday, January 24, 2023)

कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट देऊन मनोभावे दर्शन घ्या. स्वत:च स्वत:वर उपचार करू नका. डॉक्टरांचा सल्ला ऐका. कलेतील कौशल्य वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. जोडीदार तुमच्यावर आज खूश असेल. आजचा दिवस उत्साहात जाईल.
शुभरंग : हिरवा

वृषभ (TAURUS – Tuesday, January 24, 2023)
अंघोळीच्या पाण्यात हळद घाला. खमंग पदार्थ खायला मिळेल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. एकांतात वेळ घालवायला आवडेल. मन मारून जगू नका. ठरवलेली कामे वेळच्या वेळी करण्यावर भर द्या. आवडत्या व्यक्तिकडून छान सरप्राईझ मिळण्याची शक्यता आहे. सौंदर्यवृद्धीसाठी चंदनाचा वापर करा. आवडता पोषाख परिधान कराल.
शुभरंग : पोपटी

मिथुन (GEMINI – Tuesday, January 24, 2023)
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे दडपण असू शकते. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. एखादा जुना मित्र घरी येण्याची शक्यता आहे. कामात मन एकाग्र करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गणपती संकटनाशन स्तोत्राचे वाचन करा. व्यवसायात नव्या संकल्पनांचा वापर कराल.
शुभरंग : लाल

कर्क (CANCER – Tuesday, January 24, 2023)
प्रेयसी किंवा प्रियकराला लाल रंगाचे फूल भेट द्या. आरोग्य चांगले राहिल. जवळच्या व्यक्तिसोबत भांडण होण्याची शक्यता आहे. धनप्राप्तीत यश मिळेल. समाजातील काही लोकांकडून उत्तम वागणूक मिळेल. दुपारी झोपू नका. घरात गुलाबाच्या फुलांचे अत्तर शिंपडा. जुन्या मित्रांशी भेटगाठ होईल. मानसिक ताण घेऊ नका.
शुभरंग : पांढरा

सिंह (LEO – Tuesday, January 24, 2023)
कुटुंबातील लोकं तुमचे कौतुक करतील. प्रेमातील वेदनेचा अनुभव घ्याल. नवे संकल्प फलद्रुप होतील. कायदेशीर सल्ला घेण्याकरिता वकिलांना भेटण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन संधी तुमची वाट पाहात आहे. आज उधार दिलेले पैसे उद्या परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आवडीच्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : मरून

कन्या (VIRGO – Tuesday, January 24, 2023)
मोठ्या व्यक्तिची भेट होईल. कुणाच्या तरी अनपेक्षित भेटीमुळे भारावून जाल. तांदूळ, साखर, पीठ, मैदा आणि दूध अशा पांढऱ्या वस्तूंचे वृद्ध स्त्रिला दान करा. भावाचा गरजेच्या वेळी पाठिंबा मिळेल. अनपेक्षित प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. ठरवलेले प्लान बारगळण्याची शक्यता आहे. आज स्वत:साठी वेळ काढणे कठीण होऊ शकते.
शुभरंग : केशरी

तूळ (TULA- Tuesday, January 24, 2023)
चांगल्या आरोग्यासाठी दूध, दही, कापूर आणि पांढऱ्या फुलाचे दान करा. मोकळा वेळ लहान मुलांच्या सहवासात घालवा. अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घालाल. निसर्गरम्य ठिकाणी भेट द्याल. घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य कराल. नेहमीपेक्षा वेगळी कला आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
शुभरंग : किरमिजी

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, January 24, 2023)
पवित्र ठिकाणी काळे आणि पांढऱ्या रंगाचे ब्लँकेट वितरीत करा. आरोग्याकडे लक्ष द्या. कोणाच्याही वादविवादात पडू नका. महत्त्वाच्या व्यक्तिकडून प्रगतीकरिता शुभेच्छा मिळतील. दीर्घकालिन प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. मधुरावाणीचा उपयोग करा. आवडते छंद जोपासाल. मनाविरुद्ध घडले तरीही शांत राहायला शिका.
शुभरंग : निळा

धनु (SAGITTARIUS – Tuesday, January 24, 2023)
लाल किंवा नारंगी रंगाची वस्तू प्रिय व्यक्तिला भेट द्याल. सामाजिक स्नेह मेळाव्यात सहभागी व्हाल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. एकांतात राहणे आवडू लागेल. प्रिय व्यक्तिने दुस्वास केला तरीही तुम्ही प्रेमाने वागा. कार्यालयात नवीन जबाबदारीचा स्वीकार कराल. रिकाम्या वेळेत आवडती कामे कराल. अनपेक्षित पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : जांभळा

मकर ( CAPRICORN – Tuesday, January 24, 2023)
माशांना त्यांचे खाणे खाऊ घाला. आराम करण्यासाठी वेळ काढाल. व्यसन करू नका. कोणालाही दुखवू नका. कार्यक्षमता वाढवण्यासाठी कौशल्याचा स्तर वाढवा. प्रेमामध्ये घाईगडबडीने पाऊल उचलू नका. लहान मुलांशी प्रेमाने वागाल. लहानसहान गोष्टींमुळे कुरबूर करू नका. आत्मपरीक्षणाची गरज आहे.
शुभरंग : आकाशी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, January 24, 2023)
मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने कराल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस उत्साहवर्धक आहे. व्यावसायिक प्रगती होईल. सायंकाळी जोडीदारासोबत बागेत फिरायला जाल. प्रवासाची योजना आखाल. मनाजोगी खरेदी कराल. घरात शोभेच्या फुलझाडाची लागवड करा.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Tuesday, January 24, 2023)
नोकरी आणि व्यवसायात जवळच्या मित्रांसोबत आनंद लुटाल. केलेल्या गुंतवणुकीत आर्थिक सुरक्षितता मिळेल. आपण काम करत असलेल्या कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल. नव्या उपक्रमात स्वत:ला गुंतवून घ्या. वरिष्ठ कौतुक करतील. नात्याचे महत्त्व जाणा. जोडीदाराच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. आवडीचा पदार्थ स्वत: बनवायला शिकाल.
शुभरंग : केशरी