Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’24 नोव्हेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, November 24, 2022)
कला जोपासल्यामुळे वेगळं काम केल्याचा आनंद मिळेल. विश्रांतीसाठी वेळ काढाल. सायंकाळी मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान आखाल. पैसे खर्च करताना विचार करा. कुटुंबासाठी आवश्यक वेळ काढाल. शोभिवंत झाडांची लागवड करा. मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी कराल. पथ्यपाणी सांभाळा.
शुभरंग : पिवळा

वृषभ (TAURUS – Thursday, November 24, 2022)
चेहरा हसरा ठेवा. समस्या सुटायला मदत होईल. मौल्यवान वस्तूंसाठी आजचा दिवस शुभ आहे. आईवडिलांची काळजी घ्या. जोडीदारासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम बघायला जाण्यासाठी वेळ काढाल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : काळा

मिथुन (GEMINI – Thursday, November 24, 2022)
खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. किमती वस्तूंची काळजी घ्या. घरातील सामान व्यवस्थित जागच्या जागी ठेवा. वाट पाहात असलेली संधी चालून येण्याची शक्यता आहे. गोड पदार्थ अति जास्त प्रमाणात खाऊ नका. शेजाऱ्यांना मदत कराल.
शुभरंग : नारिंगी

कर्क (CANCER – Thursday, November 24, 2022)
उद्याचा दिवस उत्साहपूर्ण जाण्यासाठी आज दिवसभर विश्रांती घ्याल. मादक पदार्थांचे सेवन करू नका. किमती वस्तू हरवण्याची शक्यता आहे. त्याआधीच काळजी घ्या. तुमच्या खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न राहील. आवडती भाजी खायला मिळेल.
शुभरंग : लाल

सिंह (LEO – Thursday, November 24, 2022)
आज कामात बुडून जाल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. मैदानी खेळात भाग घ्याल. आर्थिक हानी होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबियांसोबत वायफळ वाद घालत बसू नका. प्रियजनांची काळजी घ्याल.
शुभरंग : पांढरा

कन्या (VIRGO – Thursday, November 24, 2022)
कामात बुडून जाल. अवतीभोवतीचे वातावरण आशादायी असेल, घरातील लहान मुलांची काळजी घ्या. तब्येत सांभाळा. आवडणाऱ्या व्यक्तिंची अनपेक्षित भेट संभवते. विनोदबुद्धीमुळे अवतीभोवतीचे लोकं प्रभावित होतील. मनाला प्रसन्न वाटणाऱ्या गोष्टी कराल.
शुभरंग : पोपटी

तूळ (TULA- Thursday, November 24, 2022)
प्रगती साधाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल. कुटुंबातील जबाबदाऱ्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दररोज सकाळचा वेळ व्यायाम करण्याकरिता वापरा. त्वचा आणि केस यांचे आरोग्य सांभाळा.
शुभरंग : गुलाबी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, November 24, 2022)
समतोल आहार घ्याल. नातेवाईक, मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आवडत्या व्यक्ती संपर्कात येतील. मन मारून जगू नका. नियमित व्यायाम करा. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.
शुभरंग : खाकी

धनु (SAGITTARIUS – Thursday, November 24, 2022)
आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. आर्थिकदृष्ट्या सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवाल. पथ्यपाणी सांभाळा. खरेदीसाठी आज वेळ काढाल. दिवस उदासवाणा जाणार नाही, याची काळजी घ्या.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – Thursday, November 24, 2022)
मित्रमंडळींसोबत आनंद साजरा कराल. जवळची व्यक्ती उधार पैसे मागण्याची शक्यता आहे. करिअरवर लक्ष केंद्रित करा. दुर्गासप्तशतीचा पाठ करा. प्रवासाचा योग आहे. घरातील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. आवडत्या वस्तूंची खरेदी कराल.
शुभरंग : आकाशी

कुंभ (AQUARIUS – Thursday, November 24, 2022)
मानसिकदृष्ट्या कमकुवत बनू नका. घरात समारंभ साजरा होण्याची शक्यता आहे. वायफळ पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. ब्यूटिपार्लरमध्ये जायला वेळ मिळेल. टिका करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. आवडता पदार्थ खायला मिळेल.
शुभरंग : काळा

मीन (PISCES – Thursday, November 24, 2022)
आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होते. कुटुंबातील लोकांमध्ये पैश्याला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैश्याच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो.
शुभरंग : सोनेरी