Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’26 जानेवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, January 26, 2023)

मुली आणि महिलांचा सन्मान कराल. कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वत:ला गुंतवून घ्या. आजारपणात विश्रांती घ्यायला प्राधान्य द्याल. लोकांसोबत अनावश्यक बोलण्यात बहुमूल्य वेळ वाया घालवू नका. समाजात मान मिळेल. पैसे काटकसरीने खर्च करावे लागतील.
शुभरंग : राखाडी

वृषभ (TAURUS – Thursday, January 26, 2023)
अनंतमुळाची मुळे लाल कापडात गुंडाळून ठेवा. राग अनावर होण्याची शक्यता आहे. शब्द जपून वापरा. प्रिय व्यक्तिसोबत भेटवस्तूंची देवघेव करण्यास आजचा दिवस अतिशय शुभ आहे. कामातील कौशल्य वाढीस लागण्याची संधी मिळेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल.
शुभरंग : राखाडी

मिथुन (GEMINI – Thursday, January 26, 2023)
चिंचेच्या झाडाला नियमित पाणी घाला. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पूर्वी केलेल्या मेहनतीला चांगले फळ मिळेल. इतरांचे वागणे पाहून त्यातून धडा घ्या. आत्मविश्वास वाढीस लागेल. सौंदर्याची काळजी घ्या. नोकरीसाठी प्रयत्न कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. महत्त्वाच्या व्यक्तिंशी चर्चा करताना अतिशय काळजीपूर्वक शब्द वापरा.
शुभरंग : चॉकलेटी

कर्क (CANCER – Thursday, January 26, 2023)
चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी चालण्याचा व्यायाम करा. आराध्यदेवतेची पूजा करा. जोडीदाराला दिलेले वचन पाळा. सायंकाळी बागेत फिरायला जाल. मनासारख्या कामांना वेळ द्याल. जोडीदार तुमच्यावर खूश असेल. घरातील वातावरण सकारात्मक राहाल.
शुभरंग : आकाशी

सिंह (LEO – Thursday, January 26, 2023)
घरात गुलाबाचे अत्तर शिंपडा. चिमण्यांना खाऊ घाला. आहारात खडीसाखरेचा समावेश करा. रात्री झोपण्यापूर्वी देवाकडे क्षमायाचना करा. प्रवासाच्या काही योजना ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता आहे. किराणा मालाच्या खरेदीसाठी वेळ द्याल. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : पिवळा

कन्या (VIRGO – Thursday, January 26, 2023)
गायत्री मंत्राचे वाचन करा. भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. जोडीदारासोबत पैशाच्या मुद्द्यावरून क्षुल्लक वाद होण्याची शक्यता आहे. घरी समारंभाचे आयोजन कराल. जवळच्या व्यक्तिकरिता वेळ द्याल. तुळशीला पाणी घाला. गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचे फूल वाहा.
शुभरंग : काळा

तूळ (TULA- Thursday, January 26, 2023)
मोड आलेले कडधान्य खा. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. सायंकाळी मनोरंजानेच कार्यक्रम पाहण्याचा आनंद घ्याल. विश्रांती घेण्यासाठी वेळ काढाल. घरी अनपेक्षित पाहुणे येण्याची शक्यता आहे. कुमारिकांना गोड पदार्थ खाऊ घाला.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, January 26, 2023)
मारुतीला शेंदूर वाहा. मनोराज्यात फार वेळ रमू नका. स्वत:साठी वेळ काढाल. पैसे जपून वापरा. प्रिय व्यक्तिचे मन जपावे लागेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. परसात मोगऱ्याचे फुलझाड लावा.
शुभरंग : आकाशी

धनु (SAGITTARIUS – Thursday, January 26, 2023)
तुळशीला पाणी घाला. मानसिकदृष्ट्या स्थिर राहण्याकरिता ध्यानधारणा करा. कामाचा ताण घेऊ नका. आवडत्या व्यक्तिची भेट होईल. आजचा दिवस उत्साहाने भारलेला असेल. आवडती कला आणि छंदात रमाल. मनाजोगी खरेदी कराल.
शुभरंग : नारिंगी

मकर ( CAPRICORN – Thursday, January 26, 2023)
गरिबांना खिचडी खाऊ घाला. वरिष्ठांकडून मान मिळेल. डोकं शांत ठेवून कामाला लागा. कोणाच्याही वादात पडू नका. मौल्यवान वेळ वाया घालवू नका. निसर्गाच्या सान्निध्यात राहाल. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. लोकं तुम्हाला मान देतील. स्वत:साठी वेळ काढाल.
शुभरंग : पांढरा

कुंभ (AQUARIUS – Thursday, January 26, 2023)
गरजूंना ब्लँकेटचे दान करा. मारुतीरायाचे दर्शन घ्या. सामाजिक स्नेह मेळाव्यात सहभागी व्हाल. नातेवाईकांशी अथवा जवळच्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी वेळ मिळेल. घरातील वातावरण सकारात्मक राहिल. आजचा दिवस लाभदायक आहे. जोडीदार तुम्हाला वेळ देईल. कामाच्या नव्या संधी चालून येतील.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Thursday, January 26, 2023)
आरोग्य चांगले राहिल. धन लाभाची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांची मदत मिळेल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊनच कामाला सुरुवात करा. आहारातील पथ्ये पाळावी लागतील. मनाजोगी खरेदी कराल. बागकामात मन रमवा.
शुभरंग : मोरपिसी