Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’27 जानेवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, January 27, 2023)
उगाचच ताण घेऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. प्रलोभनांपासून दूर राहा. आर्थिक व्यवहार मध्यस्थांच्या हाती देऊ नका. आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या. नियमाचे पालन करा. गोड आश्वासने देणाऱ्यांपासून सावध राहा. चांदीचे दागिने परिधान करा. मनाजोगी खरेदी करा.
शुभरंग : आकाशी

वृषभ (TAURUS – Friday, January 27, 2023)
प्रेमातील अडचणी दूर होतील. तब्येतीची काळजी घ्या. विनाकारण चिडचिड करू नका. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. योग्य वेळी थोरामोठ्यांचे मार्गदर्शन घ्या. कामे वेळच्या वेळी पूर्ण करा. नवीन ओळखी करून घ्याल. कोणाविषयीही मनात शंका आणू नका.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Friday, January 27, 2023)
आध्यात्मिक कार्यात भाग घ्याल. नियम व्यायाम करा. घरातील सदस्यांमध्ये होणारे गैरसमज टाळण्यासाठी प्रयत्न कराल. वाहन काळजीपूर्वक चालवा. अभ्यासाकडे सुरुवातीपासूनच लक्ष द्या. मोत्याचे दागिने परिधान करा. प्रवासाचे बेत आखाल. सायंकाळी मिळालेला मोकळा वेळ सत्कारणी लावा.
शुभरंग : जांभळा

कर्क (CANCER – Friday, January 27, 2023)
दिखाव्यापासून दूर राहा. स्पर्धा जिंकाल. शाब्दिक वादविवाद टाळा. पैसे अनावश्यक खर्च करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवाल. आवडत्या विषयाच्या पुस्तकाचे वाचन करा. चांगले संगीत ऐका. वेळेचा सदुपयोग कराल. जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीचा योग आहे. तुमच्या स्वप्नांना प्रयत्नांची जोड द्या.
शुभरंग : मोरपिसी

सिंह (LEO – Friday, January 27, 2023)
आपल्या विचारांना योग्य दिशा द्या. कामातील अडचणी दूर होतील. गुंतवणूक करताना नीट विचार करा. अंथरुण पाहून पाय पसरावे. झपाटून कामाला लागाल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या. गर्दीची ठिकाणे टाळा. आवश्यक ठिकाणी मौन पाळा.
शुभरंग: काळा

कन्या (VIRGO – Friday, January 27, 2023)
मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. वेळेचा अपव्यय करू नका. घरात वादाचे विषय टाळा. मैत्री जपायला शिका. आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. धार्मिक कार्यात भाग घ्या. कार्यालयीन कामात स्वत:च्या क्षमतेचा वापर कराल.
शुभरंग : हिरवा

तूळ (TULA- Friday, January 27, 2023)
कागदपत्रात गुंतू नका. तुमच्या आवडीनिवडी जपा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावी लागतील. जीवलग व्यक्तिवर जास्त अपेक्षांचे ओझे ठेवू नका. जोडीदाराच्या मतांचा आणि विचारांचा आदर करा. एकमेकांच्या मतास प्राधान्य द्या. प्रिय व्यक्तिच्या कामाचे कौतुक करा.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, January 27, 2023)
घरातील लहान मुलांच्या अडचणी सोडवाल. सत्याची कास धरा. अभ्यासाचे वेळापत्रक आखाल. कुटुंबातील वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रलोभनांपासून दूर राहा. रामरक्षा, अथर्वशीर्ष वाचा. आहाराबाबत जागरुक राहा. नवीन मित्रमैत्रिणी भेटतील.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – Friday, January 27, 2023)
आनंददायक घटना घडतील. कोणाकडूनही अपेक्षा करू नका. कलेतील कौशल्ये आत्मसात करा. शब्द जपून वापरा. सदा हसतमुख राहा. सकाळी तुळशीची पाणी घालून पूजा करा. घरातील तुटलेल्या, जुनाट वस्तू वेळीच घराबाहेर काढा. खरेदी करण्यासाठी आज वेळ काढाल.
शुभरंग : चंदेरी

मकर ( CAPRICORN – Friday, January 27, 2023)
चिंता सोडा चिंतन करा. स्वत:चे म्हणणे ठामपणे मांडा. साकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. कुटुंबातील व्यक्तिंच्या मनाचा विचार करा. वडीलधाऱ्या मंडळींचा वेळोवेळी सल्ला घ्या. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढा. दुसऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची कला आत्मसात करा. पारिजातकाचे झाड अंगणात लावा.
शुभरंग : पांढरा

कुंभ (AQUARIUS – Friday, January 27, 2023)
स्वत:च्या क्षमतेच्या बळावर निर्णय घ्या. आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. नोकरीत चातुर्याचा वापर करावा लागेल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. महत्त्त्वाची कागदपत्रे सही करण्यापूर्वी एकदा वाचून काढा. अनावश्यक बोलणे टाळा. आवडता पोषाख परिधान
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Friday, January 27, 2023)
रागावर ताबा ठेवा. प्रिय व्यक्तिकडून अचानक भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कामाची जबाबदारी पार पाडाल. आरोग्याची काळजी घ्या. कोणतीही गोष्ट ताणून न धरता त्यावर सामंजस्याने मार्ग काढण्याचा विचार करा. मानसिक स्वास्थ्याकरिता ध्यानधारणा करा. घरात शोभिवंत वस्तू आणाल.
शुभरंग : चॉकलेटी