Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘27 सप्टेंबर’चे राशीभविष्य

 

मेष (ARIES – Tuesday, September 27, 2022)
आंतरिक गुणांचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल. अनपेक्षितपणे धनलाभाची शक्यता आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी प्रयत्न करा. अनुभवाचा फायदा होईल. कोणाशीही अनावश्यक वाद घालण्यात वेळ वाया घालवू नका. आळस घालवण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : पिवळा

वृषभ (TAURUS – Tuesday, September 27, 2022)
व्यवसायात नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न कराल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. भावंडांच्या अजब व्यवहारामुळे दु:खी होऊ नका. धार्मिक कार्यात भाग घ्याल. कोणत्याही कामात अतिघाई करणे टाळा.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Tuesday, September 27, 2022)
निर्भय वृत्ती बाळगाल. दानधर्म करण्याची इच्छा निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. सावध राहा. पैसे खर्च करताना हात आखडता घ्यावा लागेल. निळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. अडलेली कामे मार्गी लागतील.
शुभरंग : चॉकलेटी

कर्क (CANCER – Tuesday, September 27, 2022)
महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न असेल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावे लागतील. महत्त्वपूर्ण कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पोपटी

सिंह (LEO – Tuesday, September 27, 2022)
इतरांशी बोलताना मधुरावाणीचा वापर करा. दुर्गादेवीला शेवंतीच्या फुलांची वेणी घाला. कोणाविषयीही पूर्वग्रह ठेवू नका. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. आवडती गोष्ट साध्य करण्यासाठी मेहनत करावी लागेल. समाजातील लोकांचा तुमच्यावर प्रभाव पडेल. कोणाशीही वादविवाद घालू नका.
शुभरंग : नारिंगी

कन्या (VIRGO – Tuesday, September 27, 2022)
प्रवास फायदेशीर ठरेल. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घ्यायला शिका. गाईला चारा खाऊ घाला. स्वत:वर विश्वास ठेवा. सायंकाळी घरात धुप दाखवा. सौंदर्याची काळजी घ्याल. मिळालेला रिकामा वेळ आवडते संगीत, पुस्तक वाचन यामध्ये घालवा. स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा मोह टाळा.
शुभरंग : हिरवा

तूळ (TULA- Tuesday, September 27, 2022)
सहकाऱ्यांशी मिळून-समजून घ्या. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नकारात्मक विचार करू नका. दररोज व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. आरोग्याची काळजी घ्या. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. कलेतील कौशल्य वाढण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : पांढरा

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, September 27, 2022)
बोलताना विचार करा. कोणतेही काम विचारपूर्वक करा. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. मनाला आवडणाऱ्या कृती करून त्यातून आनंद मिळवा. अनावश्यक बोलणे टाळा. आर्थिक लाभाकरिता नव्या योजना आखाल. घराबाहेर पडताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. ध्येयाकडे लक्ष ठेवा.
शुभरंग : गुलाबी

धनु (SAGITTARIUS – Tuesday, September 27, 2022)
जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. दुर्गेचं स्तोत्र वाचा. सकाळी तुळशीला पाणी घाला. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. घरातील पाळीव प्राण्याच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ मिळेल.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN -Tuesday, September 27, 2022)
जुन्या आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. खरं बोलण्याचा लाभ होईल. अस्थिर मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यानधारणा करा. शेजाऱ्यांची भांडण करू नका. बेजाबदारपणा टाळा.
शुभरंग : जांभळा

कुंभ (AQUARIUS – Tuesday, September 27, 2022)
भौतिक सुखात वाढ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. एकाग्रता वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पिवळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. पाणी गरम करून प्या. घरी अनपेक्षितपणे पाहुणे येण्याची शक्यता आहे. सकाळी हिरव्यागार गवतावरून चाला.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Tuesday, September 27, 2022)
आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. गणपतीचे दर्शन घ्या. केलेले प्रयत्न फलदायी होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. देवळात खडीसाखरेचा प्रसाद वाटा. तब्येतीची काळजी घ्या.
शुभरंग : नारिंगी