Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘28 सप्टेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesday, September 28, 2022)

दिवसाची सुरुवात उत्साहवर्धक कामाने करा. गरजूला मदत करा. स्पर्धेत बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. वादविवाद आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहा. तुमच्या कलेचे लोकं कौतुक करतील. जोडीदार घरकामात मदत करेल. अंघोळीनंतर चंदनाचा टिळा कपाळाला लावा.
शुभरंग : लाल

वृषभ (TAURUS – Wednesday, September 28, 2022)
पत्नीचा आदर कराल. अडचणींवर हसत हसत मात कराल. कुटुंबीय आणि मित्रमंडळींबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. ठरवलेल्या योजना पूर्ण करण्याकडे लक्ष द्याल. आजचा दिवस जोडीदारासोबत घालवाल. सायंकाळी आवडीचा पदार्थ खायला मिळण्याची शक्यता आहे. देवीला शेवंतीची वेणी वाहा.
शुभरंग : मोरपिसी

मिथुन (GEMINI – Wednesday, September 28, 2022)
रोज सकाळी गणपतीचा नामजप करा. रात्रीच्या वेळी एकांतात राहणे आवडू लागेल. व्यायामाला महत्त्व द्या. धैर्य बाळगाल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. प्रसन्न वातावरण असलेल्या स्थानी जाण्याची इच्छा होईल. प्राण्यांवर दया करा. कोणाचाही जाच करू नका. घरातील लहान मुलांना वेळ द्या.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Wednesday, September 28, 2022)
लाल आणि भुऱ्या चिमण्यांना खडीसाखर खाऊ घाला. आजचा दिवस उत्साही असेल. घरात शांतता राखा. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. कोणालाही पैसे उधार देऊ नका. इतरांकडून अपेक्षा करू नका. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : हिरवा

सिंह (LEO – Wednesday, September 28, 2022)
घरातील मोठ्या व्यक्तिंकडून लाभ होण्याची शक्यता आहे. मनोवृत्ती खंबीर ठेवा. जोडीदारासोबत सुसंवाद साधाल. आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे आपली कामे सहजपणे होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. कोणतेही काम करताना हेतू शुद्ध ठेवा. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
शुभरंग : पांढरा

कन्या (VIRGO – Wednesday, September 28, 2022)
आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे. कामात भावंडांची मदत होईल. प्रेमात आकंठ बुडालेल्यांना प्रेमगीत ऐकू येईल. कोणाच्याही कोंडीत पकडले जाल, असे काही करू नका. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळेल. जवळचे नातेवाईक भेटतील.
शुभरंग : हिरवा

तूळ (TULA- Wednesday, September 28, 2022)
भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. नातेवाईकांकडून कोणतीही अपेक्षा करू नका. काही लोकांना बेरोजगाराची संधी मिळू शकेल. कामात लक्ष लागेलच असे नाही. सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. प्रत्येकाशी प्रेमाने बोला. विचार सकारात्मक ठेवा. विधवा स्त्रियांना मदत करा. आरोग्य जपा.
शुभरंग : क्रीम

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, September 28, 2022)
निळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. प्रकृतीची काळजी घ्या. प्रेमात अधिकाराचा वापर कराल. सौंदर्याची काळजी घ्या. ब्यूटीपार्लरला जाण्यासाठी वेळ काढाल. जोडीदारासोबत भरपूर वेळ घालवाल. आवडते संगीत किंवा मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्यावासा वाटेल. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. अंगणात लावलेल्या रोपट्याची निगा राखा.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – Wednesday, September 28, 2022)
हनुमानाची पूजा करा. करमणुकीच्या कार्यक्रमांकरिता पैसे खर्च कराल. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न असेल. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. संकुचित विचार करू नका. दुसऱ्यांच्या स्वभावाचा तुमच्यावर परिणाम होऊ देऊ नका. कोणालाही तुमचा फायदा घेऊ देऊ नका. आवडती कामे हाती घ्या. सकारात्मक राहा.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN -Wednesday, September 28, 2022)
घरात मासे पाळा. तुमचे आवडचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची वेळ जवळ आली आहे, असे समजा. अतिउत्साही होणे हे काही वेळा संकटात टाकणारे असू शकते, त्यामुळे सावध राहा. कोणाकडेही अनावश्यक प्रतिक्रिया व्यक्त करू नका. रिकामा वेळेत आवडते काम कराल. मनाप्रमाणे कामे आज होतीलच असे नाही. प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवाल.
शुभरंग : राखाडी

कुंभ (AQUARIUS – Wednesday, September 28, 2022)
रुद्राक्ष गळ्यात घाला. कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाल. नातेवाईक जुने भांडण उकरून काढण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठ एखादे नवे काम हाती सोपवतील. मानसिक तणाव दूर करण्याकरिता ध्यानधारणा, योगासने, नामसाधना किंवा योगसाधनेचा अवलंब कराल.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Wednesday, September 28, 2022)
अति व्यसन टाळा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. सिनेमा पाहायला जाल. प्रलंबित योजना मार्गी लागतील. घरकामात भावंडं मदत करतील. अनपेक्षित भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. इच्छा पूर्ण होईल. नव्या संधी चालून येतील. आजारपणावर योग्य औषधे, पथ्य-पाणी कराल. आजचा दिवस आनंददायी आहे.
शुभरंग : नारिंगी