Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’30 जानेवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Monday, January 30, 2023)
घरातील वातावरण आनंदाचे असेल. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. स्त्रियांना माहेरहून चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवास कराल. प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंदी व्हाल.
शुभरंग : केशरी

वृषभ (TAURUS – Monday, January 30, 2023)
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात विविध चिंता येण्याची शक्यता आहे. अपूर्ण कामे पूर्ण कराल. काही कारणास्तव खर्च वाढेल. केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. निराश होऊ नका. घाईघाईने निर्णय घेऊ नका. कोणाचे तुमच्याविषयी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.
शुभरंग : हिरवा

मिथुन (GEMINI – Monday, January 30, 2023)
मित्रमैत्रिणींच्या भेटी होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा. आजचा दिवस आपल्यासाठी शुभदायी आहे. व्यापारात प्रगती कराल. प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. महादेवाच्या देवळात जाऊन अभिषेक करा. मन:स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करा.
शुभरंग : मोरपिसी

कर्क (CANCER – Monday, January 30, 2023)
आज सर्व कामे शांतपणे कराल. गृहसजावटीकरिता वेळ काढाल. घरगुती वापराचे साहित्य खरेदी कराल. व्यापारी आणि नोकरदार यांना लाभ होण्याची शक्यता आहे. घरात सुख-शांती नांदेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभाचा आहे. सकाळचा वेळ बागकामात घालवा.
शुभरंग : किरमिजी

सिंह (LEO – Monday, January 30, 2023)
कोणाशीही वादविवाद घालू नका. उतावीळपणा करू नका. निर्णय घेताना घरातील मोठ्यांचे मत विचारात घ्याल. व्यवसायात अडचणी येण्याआधी सावध व्हा. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल. स्वत:साठी वेळ काढा.
शुभरंग : पिवळा

कन्या (VIRGO – Monday, January 30, 2023)
सूर्योपासना करा. क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. बाहेरचे खाण्याने प्रकृती बिघडू शकते. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आग आणि पाणी यापासून जपून राहावे लागेल. एखादे नवीन काम हाती घेण्याची शक्यता आहे. आवडीचा पोषाख परिधान करा. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : पांढरा

तूळ (TULA- Monday, January 30, 2023)
मित्रांसह सहलीला जाल. यश आणि किर्ती वाढेल. उंची वस्त्र आणि दागदागिन्यांची खरेदी करण्याचा योग आहे. मन:स्वास्थ्य जपाल. आजचा दिवस प्रिय व्यक्तिसोबत घालवाल. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ मिळेल. मनातील इच्छा व्यक्त कराल.
शुभरंग : मोती

वृश्चिक ( SCORPIO – Monday, January 30, 2023)
हाती आलेली संधी सोडू नका. कुटुंबियांशी प्रेमाने वागा. आज नवीन कामाची सुरुवात होईल. ठरलेली भेट न झाल्याने निराश होऊ नका. खर्च करताना हात आखडता घ्यावा लागेल. नवीन कामाची सुरुवात करताना घरातील मोठ्या व्यक्तिचा सल्ला घ्या. पक्ष्यांना दाणा-पाणी खाऊ घाला. मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग कराल.
शुभरंग : पिस्ता

धनु (SAGITTARIUS – Monday, January 30, 2023)
आजचा दिवस आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. पोटाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. घरातील लहान मुलांचे स्वास्थ्य, अभ्यास याकडे लक्ष द्यावे लागेल. घरातील वातावरण सुखद असेल. साहित्य आणि लेखन क्षेत्रात रस घ्याल. वादविवाद, बौद्धिक चर्चा यापासून दूर राहणे हिताचे आहे. जास्वंदाचे फूल आणि दुर्वा मंगळवारी गणपतीला वाहा.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN – Monday, January 30, 2023)
आरोग्याची काळजी घ्यावे. एखादी जुनी मैत्रिण मदत मागण्याची शक्यता आहे. नवीन कला जोपासण्याचा प्रयत्न कराल. विश्रांतीसाठी वेळ काढाल. आवडत्या व्यक्तिचा सहवास लाभेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. सकाळच्या कोवळ्या उन्हाचा फायदा घ्या.
शुभरंग : खाकी

कुंभ (AQUARIUS – Monday, January 30, 2023)
वास्तूशुद्धीकरिता घरात धूप दाखवा. आजचा कुटुंबियांसोबत मजेत घालवाल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढेल. आवडत्या कामात मन रमवाल. मित्रमैत्रिणींशी मनमोकळ्या गप्पा माराल. कोणाकडूनही फायद्याची अपेक्षा ठेवू नका. प्रिय व्यक्तिच्या सहवासात रमून जाल. चाफ्याची फुले देवाला वाहा.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Monday, January 30, 2023)
अति खाणे टाळा. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू देऊ नका. डोळ्यांची काळजी घ्या. एखाद्या व्यक्तिशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे जपून राहा. विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. सकाळी तुळशीला पाणी घालून पूजा करा. आराध्यदेवतेला प्रार्थना करा.
शुभरंग : सोनेरी