Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘30 सप्टेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, September 30, 2022)
मनातील अस्वस्थता दूर होईल. तुमच्या मनातलं गुपित योग्य व्यक्तिकडे बोलाल. आर्थिक लाभासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कार्यालयातील नव्या बदलांचा स्वीकार कराल. पक्ष्यांना दाणे खाऊ घाला.
शुभरंग : चॉकलेटी

वृषभ (TAURUS – Friday, September 30, 2022)
कामात मित्रमंडळी मदत करतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. केशरी रंगाचा पोषाख परिधान करा. सकाळी सूर्यनमस्कार घाला. मनाजोगी खरेदी कराल. गाईला पोळी खाऊ घाला. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल. झोपण्याकरिता चटईचा वापर करा. वेळ वाया घालवू नका.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Friday, September 30, 2022)
धन लाभाची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती कराल. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या सहकार्याने प्रगती कराल. हिरव्या रंग आपल्यासाठी आज लाभदायक आहे. सकाळी तुळशीला न विसरता पाणी घाला. आहारात गुळाचा समावेश करा. गणपतीची उपासना करा.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER – Friday, September 30, 2022)
अचानक चांगली बातमी कानी येण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे योग आहेत. आरोग्याची काळजी घ्या. एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. गरिबांना फळांचे दान करा. मोत्याच्या दागिन्यांची खरेदी कराल. नवीन वस्त्र खरेदी कराल.
शुभरंग : पिवळा

सिंह (LEO -Friday, September 30, 2022)
आर्थिक लाभाची शक्यता आहे. शिव मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अभिषेक घाला. गुलाबी रंग आज आपल्यासाठी लाभदायक आहे. नातेवाईक अनपेक्षितपणे घरी येण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तिसोबत सिनेमा पाहायला जाल. नाती घट्ट जपाल. नोकरी-व्यवसायात घेतलेली मेहनत यश देईल.
शुभरंग : पोपटी

कन्या (VIRGO – Friday, September 30, 2022)
गणपतीच्या देवळात प्रसाद वाटप करा. आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहवर्धक ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबियांचाही विचार कराल. मित्रमैत्रिणींसोबत असलेल्या संबंधात सुधारणा होईल. व्यवसायत नव्या लोकांना सामावून घ्याल. वाणसामानाची खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : हिरवा

तूळ (TULA- Friday, September 30, 2022)
समाजात मान-सन्मान वाढेल. आज अडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्य जपा. मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आज वेळ काढाल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. गायत्री मंत्राचा जप करा. आराध्यदेवतेचे दर्शन घ्याल.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, September 30, 2022)
मेहनतीचे फळ चांगले मिळेल. कोणत्याही कामात हलगर्जीपणा करू नका. वरिष्ठ आज तुमच्यावर खूश होतील. प्रगती करण्याचे मार्ग तुमच्याकरिता खुले होतील. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. इतरांचा विचार करा. अन्नदान करा.
शुभरंग : चंदेरी

धनु (SAGITTARIUS – Friday, September 30, 2022)
करियरमध्ये प्रगती करण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. कार्यालयात जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक प्रवास करण्याचे योग आहेत. समाजात मानसन्मान मिळेल. जुन्या मैत्रिणीची अनपेक्षित भेट होण्याची शक्यता आहे. दागदागिन्यांची खरेदी कराल.
शुभरंग : पांढरा

मकर ( CAPRICORN -Friday, September 30, 2022)
कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कामात बदल होण्याची शक्यता आहे. देवळात जाऊन देवीचे दर्शन घ्या. प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आहारात गूळ-खोबऱ्याचा समावेश करा. मुग्यांना साखर घाला.
शुभरंग : केशरी

कुंभ (AQUARIUS – Friday, September 30, 2022)
भावनेत वाहून जाऊ नका. कोणतेही काम करताना त्यातील सत्यता पडताळून पाहावी लागेल. धार्मिक कार्यानिमित्त प्रवास घडेल. कलेतील कौशल्य जपाल. घरातील लहान मुलांसाठी वेळ काढाल. गोशाळेला अर्पण द्या. आहारात दुधाच्या पदार्थांचा समावेश करा.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Friday, September 30, 2022)
गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. कामे लवकर पूर्ण होतील. घराचे सुशोभिकरण कराल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. आपली मते इतरांवर लादू नका. दररोज सकाळी सूर्यनमस्कार घाला. योगसाधना, ध्यानधारणेला महत्त्व द्या.
शुभरंग : काळा