Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘4 फेब्रुवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Saturday, February 4, 2023)
अविचारीपणे वागू नका. आवडीची पुस्तके वाचण्यासाठी वेळ द्याल. घरातल एखाद्या धार्मिक समारंभाचे आयोजन कराल. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंचे आशीर्वाद मिळतील. आवडत्या ठिकाणी कॉफी प्यायला जाल.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Saturday, February, 2023)
पावसाळ्याकरिता नवीन बुटांची खरेदी कराल. सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल. आरोग्याची काळजी घ्याल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करून फिरायला जाल.
शुभरंग : हिरवा

मिथुन (GEMINI – Saturday, February, 2023)
मधाचे दान करा. धार्मिक कार्यासाठी देणगी द्याल. मैदानी खेळ खेळा. योगासने करण्यासाठी वेळ काढाल. कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका. उगाचच कोणाला सल्ला द्यायला जाऊ नका. योग्य निर्णय घ्या.
शुभरंग : निळा

कर्क (CANCER – Saturday, February, 2023)
आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहाराचे पथ्यपाणी सांभाळा. मनातल्या मित्रांशी मनमोकळेपणे बोलण्यासाठी वेळ मिळेल. इतरांच्या कामाचे मनापासून कौतुक करा. सकारात्मक विचार करा.
शुभरंग : आकाशी

सिंह (LEO – Saturday, February, 2023)
कुटुंबासोबत खरेदीला जाल. आजचा दिवस मजेत घालवाल. सकाळचा वेळ ध्यानधारणेत घालवाल. घरात आवराआवरीची कामे कराल. प्रियजनांची भेट होईल.
शुभरंग : पोपटी

कन्या (VIRGO – Saturday, February, 2023)
घरात गंगेचे पाणी शिंपडा. आजचा दिवस लाभदायक आहे. प्रलंबित कामं पूर्ण करण्यात वेळ जाईल. जोडीदारासोबत करमणुकीचे कार्यक्रम पाहण्याचा आनंद घ्याल. निसर्गरम्या ठिकाणी फिरायला जाल. सकाळचा थोडा वेळ बागकामासाठी द्या.
शुभरंग : केशरी

तूळ (TULA- S Saturday, February, 2023)
अंघोळीच्या पाण्यात कापूर घाला. आठवड्यातून एकदा तरी सूर्य स्नान करा. कारण कोणतेही असले तरी दु:खी कष्टी आणि निराश होऊ नका. जोडीदारासोबत खूप गप्पा माराल. उत्तम आरोग्याकरिता चालण्याचा व्यायाम करा. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, February, 2023)
गरिबांना कपड्यांचे दान करा. कल्पनाविश्वात रमू नका. प्रियजनांसोबत वेळ घालवाल. मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. जोडीदारासोबत वाद घालू नका. पिंपळाच्या झाडाखाली सायंकाळी दिवा लावा.
शुभरंग : पांढरा

धनु (SAGITTARIUS – Saturday, February, 2023)
पाकिटात रेशमी धाग्याचा पांढरा तुकडा ठेवा. धनलाभाची शक्यता आहे. मौल्यवान वस्तूंची भेट मिळेल. आवडता पदार्थ खायला मिळेल. मिळालेला रिकामा वेळ वाचन, संगीत ऐकण्यात घालवाल. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – Saturday, February, 2023)
निरनिराळ्या रंगाचे प्रिंटेड कपडे परिधान करा. दु:खात असलेल्या व्यक्तिला मदत करा. घरातले सदस्य आज तुम्ही त्यांना वेळ दिला नाही म्हणून नाराज होतील. इतरांच्या गरजा पूर्ण कराल. प्रियकर किंवा प्रेयसीकडून आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.
शुभरंग : नारिंगी

कुंभ (AQUARIUS – Saturday, February, 2023)
कार्यालयातील कामकाज एकाग्रतेने कराल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीने करू नका. व्यसनं टाळा. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आज लोकं तुमचे अभिनंदन करतील. प्रिय व्यक्ति आज तुमच्यासाठी एखादी सरप्राईझ डिश बनवण्याची शक्यता आहे.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Saturday, February, 2023)
प्राण्यांची काळजी घ्या. ज्येष्ठांनी तब्येतीला जपा. दूरच्या नातेवाईकाकडून आनंदाची बातमी कानी येण्याची शक्यता आहे. दिवस उत्तम जाईल. स्वत:साठी वेळ काढाल. आपल्यातील कमतरतेचे चिंतन करा. विचारात सकारात्मकता आणा. रोचक पुस्तके वाचाल.
शुभरंग : चंदेरी