Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा  ‘5 डिसेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Monday, December 5, 2022)
लाल रंगाचा पोषाख परिधान कराल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल. कामातला उत्साह शेवटपर्यंत टिकून राहील. प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवू शकाल. अति काळजी करणे टाळा. नातेवाईकांसोबत प्रेमाचे चार क्षण व्यतीत कराल. सकाळी सूर्योपासना करा. वाण सामानाची खरेदी करण्यासाठी वेळ काढू शकाल.
शुभरंग : केशरी

वृषभ (TAURUS – Monday, December 5, 2022)
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गाईला गूळ खाऊ घाला. ताणतणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अस्वस्थ होऊ नका. करमणुकीवर पैसे खर्च कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. स्वप्न सत्यात उतरेल. सातत्याने प्रामाणिकपणे काम करत राहा. कुमारिकांना गूळ आणि चणे वाटा. सायंकाळी घरात धूप दाखवा.
शुभरंग : जांभळा

मिथुन (GEMINI – Monday, December 5, 2022)
गोशाळेत सव्वा किलो धान्य दान करा. भिती, चिंता, राग, लोभ अशा नकारात्मक गोष्टी सोडून द्या. भाऊ-बहिणींच्या मदतीने आर्थिक लाभ मिळेल. अवतीभोवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजतीलच असे नाही. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेचा लाभ होईल. कामाकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांचा फायदा होईल. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. आहारात फळांचा समावेश करा.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Monday, December 5, 2022)
चांदीच्या वाटीतून दही खा. आजचा दिवस काळजी मिटवणारा आहे. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील. परक्या लोकांचा सल्ला मानू नका. नातेसंबंधात दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. नवे मित्र जोडाल. प्रलंबित कामे पूर्ण कराल. आरोग्याची काळजी घ्या. शारीरिक उत्साह टिकून राहील. एखाद्या रम्य परिसरात सहलीला जाल.
शुभरंग : पांढरा

सिंह (LEO – Monday, December 5, 2022)
आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करा. मनमोकळ्या आणि निडर स्वभावामुळे मित्र तुमचे कौतुक करतील. धन लाभ होण्याची शक्यता आहे. नव्या योजना आणि उपक्रम राबवाल. सायंकाळी पार्क किंवा बागेत फिरायला जाल. एकांत जागेत वेळ घालवाल. मन रमवणाऱ्या पुस्तकांचे वाचन कराल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिंच्या घराबाहेर पडताना पाया पडा.
शुभरंग : पोपटी

कन्या (VIRGO – Monday, December 5, 2022)
घराच्या परिसरात केळीचे झाड लावा. घरातील वातावरण सकारात्मक राहील. प्रिय व्यक्तिला वेळेत निरोप पोहोचवाल. रिकामा वेळ जवळच्या लोकांसोबत घालवाल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. कल्पनाविश्वात रमावेसे वाटेल. हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण कराल. सशक्त मन सशक्त शरीरात वास करते, हे लक्षात ठेवा. आवडत्या व्यक्तिचा सल्ला माना. गुलाबाचे झाड घराच्या अंगणात लावा.
शुभरंग : राखाडी

तूळ (TULA- Monday, December 5, 2022)
शिव मंदिरात प्रसाद वाटा. शरीराला तेलाने मसाज करा. स्नायू मोकळे होतील. कुटुंबाला वेळ द्याल. तक्रार करायला वाव ठेवू नका. डोकं शांत ठेवा. स्वत:ला वेळ देण्याचा प्रयत्न कराल. घरातील राहून गेलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढाल. ब्यूटिपार्लरमध्ये जा. कार्यालयात वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. कोणाकडूनही उधार घेऊ नका. घेतलेले पैसे वेळीच परत द्या.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Monday, December 5, 2022)
तेलकट, तिखट आहार टाळा. कुटुंबियांसोबत फिरायला जाण्यासाठी वेळ काढाल. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या जीवनात विशेष स्थान असेल. आर्थिक फायदा मिळेल. पूर्वसूचना न देता नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत सायंकाळी उत्तम वेळ जाईल. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी कराल. घरातील फुलदाणीत सुगंधित फुले ठेवा. वाहन चलवताना सावध राहा.
शुभरंग : पांढरा

धनु (SAGITTARIUS – Monday, December 5, 2022)
दिव्यांग व्यक्तिंना मदत करा. व्यर्थ वेळ वाया घालवू नका. परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य व्यक्तिचा सल्ला घ्या. व्यावसायिक संकल्पना राबवण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. चांगले यश मिळवाल. कुटुंबियांची मदत घ्याल. कामाचे योग्य मानधन मिळेल. आहारविहाराची पथ्ये सांभाळावी लागतील. कामातून मिळालेला रिकामा वेळ स्वत:साठी द्या. लोकं तुमच्या कलेची प्रशंसा करतील. कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळेल.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – Monday, December 5, 2022)
घरामध्ये लाल रंगाचे पडदे आणि चादरीचा उपयोग कराल. महत्त्वाच्या आर्थिक करारांवर विचार करून निर्णय घ्या. प्रिय व्यक्तिला वचन द्यावे लागेल. घरातील सदस्यांसोबत गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. मनाविरुद्ध प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आज कार्यालयातून लवकर घरी यायला मिळेल. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. मेनिक्युअर-पेडिक्युअर कराल.
शुभरंग : चंदेरी

कुंभ (AQUARIUS – Monday, December 5, 2022)
आईकडून तांदूळ किंवा चांदी घेऊन ते जवळ ठेवा. घराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घ्याल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराशी बोलून प्रवासाचा बेत आखाल. घरातील लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन कला आत्मसात करण्यासाठी प्रयत्न कराल. घराबाहेर जाताना थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. घरात सायंकाळी कापराचा धूप दाखवा. आवडता पोषाख परिधान कराल.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Monday, December 5, 2022)
गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. प्रकृती चांगली राहिल. शिक्षणासाठी पैसे खर्च कराल. कोणाशीही कठोर बोलू नका. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल. स्वत:साठी वेळ द्याल. मनन चिंतन करा. आवडते संगीत ऐकणे, पुस्तके वाचणे यात मन रमवाल. सकाळी तुळशीला पाणी घाला. प्रिय व्यक्तिची भेट घ्याल. अनावश्यक धावपळ कमी करा.
शुभरंग : आकाशी