Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘6 ऑगस्ट’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Saturday, August 6, 2022)

मानसिक शांततेकरिता ध्यानधारणा करा. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. घरातील लहान मुलांकरिता वेळ काढाल. सकाळी तुळशीला पाणी घाला. सायंकाळी जोडीदाराबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवाल.
शुभरंग : हिरवा

वृषभ (TAURUS – Saturday, August 6, 2022)
प्रवास आनंददायक असेल. सायंकाळी मित्रमंडळींसोबत भोजनाचा आनंद घ्याल. नवा व्यवसाय हाती घ्याल. अनावश्यक वेळ वाया घालवू नका. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल.
शुभरंग : मोरपिसी

मिथुन (GEMINI – Saturday, August 6, 2022)
आजचा दिवस आपल्यासाठी शुभदायक आहे. मित्रांसोबत सहलीला जाण्याचे नियोजन आखाल. प्रिय व्यक्तीसोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. लाल रंगाचा पोषाख परिधान कराल. मिळालेल्या संधीचा फायदा घ्याल.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Saturday, August 6, 2022)
आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेवू नका. प्रिय व्यक्तिला वेळ दिला नाही, तर ती नाराज होऊ शकते. इतरांवर टीका करण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुम्हाला टीकेलाही बळी पडावे लागू शकते. इतरांना तिखट उत्तरे देणे टाळा. तुमच्या विनोदी स्वभावामुळे लोकप्रियता वाढवेल. तांत्रिक क्षमता वाढवा.
शुभरंग : आकाशी

सिंह (LEO – Saturday, August 6, 2022)
परदेशगमनाचे संकेत आहेत. लहानसहान मतभेद दूर करा. छंद जोपासण्यासाठी वेळ काढाल. शिक्षणाचा उपयोग अयोग्य कामासाठी करू नका. टोकाचे विचार करून मनस्ताप करून घेऊ नका. आर्थिक खर्च आवश्यकतेपेक्षा जास्त करू नका.
शुभरंग : निळा

कन्या (VIRGO – Saturday, August 6, 2022)
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. स्वत:चे यश मोठे करू नका. मित्र परिवारासोबत वेळ घालवाल. आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. खर्चापेक्षा बचतीकडे लक्ष द्या. कोणालाही जामीन राहू नका. इतरांची अतिचौकशी करायला जाऊ नका.
शुभरंग : राखाडी

तूळ (TULA- Saturday, August 6, 2022)
सरकारी कामे वेळेत पूर्ण करा. घरातील वाद घरातच सोडवा. शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. मनाच्या एकाग्रतेसाठी गणपतीची उपासना करा.
शुभरंग : जांभळा

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, August 6, 2022)
बाहेरील पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. आहार-विहाराकडे लक्ष द्या. घर दुरुस्तीची कामे रेंगाळणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदारासोबत सामंजस्याने वागाल. शरीर निरोगी राखण्यासाठी व्यायाम, चालणे, योगसाधना करा.
शुभरंग : लाल

धनु (SAGITTARIUS – Saturday, August 6, 2022)
अभ्यासासाठी मेहनत करावी लागेल. वृद्ध व्यक्तिंचा अपमान करू नका. नातेवाईकांवर अवलंबून राहू नका. घरातील लहान मुलांची काळजी घ्याल. पुस्तक वाचनासाठी वेळ काढाल. मिळालेला वेळ वाया घालवू नका.
शुभरंग : पांढरा

मकर (CAPRICORN – Saturday, August 6, 2022)
विचारांना कृतीत आणा. गोड बोलण्याचा प्रयत्न करा. आरोग्य तपासणीसाठी टाळाटाळ करू नका. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. झोपेचे तंत्र सांभाळा. घरकामात भावंडांची मदत मिळेल. श्रेष्ठ व्यक्तिंच्या सल्ल्याने समस्या सोडवा. विचारांवर ताबा ठेवा.
शुभरंग : सोनेरी

कुंभ (AQUARIUS – Saturday, August 6, 2022)
इतरांचे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. वाहन सावकाश चालवावे. कोणतेही साहस करताना विचार करा. आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. अचानक बदलणाऱ्या स्वभावाचे कारण शोधा. प्रकृतीकडे लक्ष द्या.
शुभरंग : खाकी

मीन (PISCES – Saturday, August 6, 2022)
स्वत:चे म्हणणे इतरांवर लादू नका. नवीन हितसंबंध जोडले जातील. नव्या उपक्रमाकरिता पैशांची तरतूद करावी लागेल. आनंदाची बातमी कानी येईल. शेजाऱ्यांना मदत करा. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : पिवळा