Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘6 डिसेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Tuesday, December 6, 2022)
आज सुखांचा मनापासून आनंद घेता येईल. आर्थिक लाभ उत्तम मिळेल. जोडीदाराकडून सुखद धक्के मिळण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस सुखाचा आहे. छोट्या सहली आणि समारंभातून आनंद घ्याल. मैत्रिणी आणि नातेवाईक भेटतील. नवग्रह स्तोत्रांचे वाचन करा. सगळ्या अडचणी संपल्या अशा भ्रमात राहू नका. सकाळी सूर्यनमस्कार घाला.
शुभरंग : पिवळा

वृषभ (TAURUS – Tuesday, December 6, 2022)
बुधवारी श्रीरामाचे दर्शन घ्या. कोणावरही आंधळा विश्वास टाकू नका. आज कौटुंबिक आणि आर्थिक दोन्ही सौख्य अनुभवाल. कोणालाही पैसे उसने देऊ नका. घरातील लहान मुलांकडून आनंदाची बातमी कानी येईल. घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. रामरक्षा वाचा. कपाळाला विभूती लावा. सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावा. मानसिक शांतता मिळेल. महत्त्वाची कागदपत्रे सही करण्यापूर्वी वाचा.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Tuesday, December 6, 2022)
गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नका. ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. संयम राखा. अति भावनाशील होणे टाळा. मनाजोगी खरेदी करण्यात यश मिळेल. आजचा दिवस लाभदायक आहे. मन:शांतीकरिता ध्यानधारणा कराल. आवडत्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. प्रिय व्यक्तिसोबत मनमोकळ्या गप्पा माराल. अडलेली कामे पूर्ण होतील.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Tuesday, December 6, 2022)
सकाळी सूर्याचे दर्शन घ्या. सूर्याचे स्तोत्र म्हणा. उपासनेकडे लक्ष द्या. कुटुंबाची साथ मिळेल. आनंदाचा मनापासून अनुभव घ्या. जोडीदारासोबत मनमोकळेपणाने वागाल. मनातले त्यांच्याशी बोला. योग्य सल्ला मिळेल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. पक्ष्यांना दाणे घाला. पिंपळाजवळ सायंकाळी दिवा लावा. आराध्य देवतेचे स्मरण करा.
शुभरंग : आकाशी

सिंह (LEO – Tuesday, December 6, 2022)
शंकराचे दर्शन घ्या. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हिवाळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. सणातून आनंद घ्याल. पथ्पपाणी नीट सांभाळा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नकारात्मक विचार मनातून काढून टाका. देवळात अन्नदान करा. सायंकाळी घरात धूपदीप दाखवा. औषधे वेळच्या वेळी घ्या.
शुभरंग : केशरी

कन्या (VIRGO – Tuesday, December 6, 2022)
मनात घोळणारी एखादी गोष्ट आज पूर्ण होईल. आजचा दिवस उत्तम आहे. नव्या संकल्पना राबवा. आजीआजोबांचे आशीर्वाद घ्या. त्यांना नमस्कार करूनच घराबाहेर पडा. कलेतील कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. गोशाळेत दानधर्म करा. सामाजिक कार्यात भाग घ्यावासा वाटेल. मनातील अनावश्यक विचार काढून टाका. सायंकाळपर्यंत शुभ बातमी कानी येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : जांभळा

तूळ (TULA- Tuesday, December 6, 2022)
पांडुरंगाचे दर्शन घ्या. शांत निवांत दिवसाचा अनुभव घ्याल. आज तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे. जोडीदारासोबत बोलून भविष्याचे नियोजन कराल. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा चांगला मोबदला मिळेल. आज आरोग्य चांगले राहिल. दूरचे नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. तुमचे मन दुखावलेल्या व्यक्तिला मनापासून क्षमा करा.
शुभरंग : पांढरा

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, December 6, 2022)
आर्थिकदृष्ट्या ताण घेऊ नका. काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे. कामांचे कौशल्याने नियोजन कराल. कामाकडे लक्ष द्या. कोणाशीही बोलताना मधुरावाणीचा वापर करा. प्रेमाने आणि सकारात्मक बोला. निळ्या रंगाचा पोषाख परिधान करा. जुनी येणी वसूल होतील. काचेच्या फुलदाणीत पाच गुलाबाची लाल रंगाची फुले ठेवा. शारीरिक आणि मानसिक सौंदर्य जपा. कलेची आराधना करा.
शुभरंग : चिंतामणी

धनु (SAGITTARIUS – Tuesday, December 6, 2022)
दत्त महाराजांचे दर्शन घ्या. कामातला आनंद मिळेल. कामाकडे लक्ष एकाग्र कराल. झोकून देऊन काम करावे लागेल. सहकारी सहकार्य करतील. कार्यालयात नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवण्याची शक्यता आहे. समाजात कौतुक होईल. कामाचा उरक वाढेल. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल. अनावश्यक बडबड करून नका.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – Tuesday, December 6, 2022)
मारुती स्तोत्र वाचा. अडचणी आल्या तरी पाठिंबा मिळेल. कौशल्याने सगळ्या गोष्टी निभावून न्याल. आजचा दिवस सुखद आहे. एखाद्या कटकट करणाऱ्या माणसाचे शब्द मनाला लावून घेऊ नका. आवडता पोषाख परिधान करा. मित्रमैत्रिणींमध्ये रमाल. केलेल्या मेहनतीचे चिज होईल. मनाजोगी खरेदी कराल. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : हिरवा

कुंभ (AQUARIUS – Tuesday, December 6, 2022)
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी अजिबात काळजी करू नका. आजचा दिवस मौजमजेचा आहे. शनी स्तोत्राचे वाचन करा. घरात एखाद्या समारंभाचे आयोजन कराल. घरात मोरपिस ठेवा. सकाळी सूर्यनमस्कार घाला. मन:शांतीसाठी ध्यानधारणा करा. स्वत:साठी वेळ काढा. एखाद्यावर अतिविश्वास ठेवू नका. घराबाहेर पडताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवा. निंदा करणारे तुमचे हितचिंतक आहे, हे लक्षात घ्या.
शुभरंग : आकाशी

मीन (PISCES – Tuesday, December 6, 2022)
लक्ष्मीमातेचे दर्शन घ्या. मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. येणाऱ्या चांगल्या दिवसांचा अनुभव घ्याल. आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. जोडीदाराकडून सुखद अनुभव येतील. घरात धार्मिक समारंभाचे आयोजन कराल. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. मन मारून जगू नका. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी मन रमवा.
शुभरंग : सोनेरी