Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘6 फेब्रुवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Monday, February 6, 2023)

हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. व्यसन सोडा. स्वत:साठी वेळ काढा. नवीन नातेसंबंध जोडाल. कलेतील कौशल्य जोपासा. मिळालेला रिकामा वेळ पुस्तक वाचनात घालवाल. आजचा दिवस बहारदार असेल. आर्थिक गुंतवणूक विश्वास असलेल्या ठिकाणीच करा. शंकराला अभिषेक करून बेलपत्र वाहा.
शुभरंग : मोरपिसी

वृषभ (TAURUS – Monday, February 6, 2023)
घरातील फुलदाणीत लाल रंगाची गुलाबाची फुले ठेवा. मित्रांसोबत मेजवानीचा प्लान आखाल. कुटुंबियांसाठी वेळ काढा. सायंकाळी बागेत फिरायला जाल. घरात देवीस्तोत्राचे पठण करा. घरात धूप करा. दिवसभर मन मन लावून काम कराल. घराबाहेर जाताना आईवडिलांचे आशीर्वाद घ्या.
शुभरंग : पोपटी

मिथुन (GEMINI – Monday, February 6, 2023)
इतरांसोबत आनंद वाटून घेतल्याने आरोग्य बहरून जाईल. भावंडांकडून उधार पैशांची मागणी होईल. लहान मुलांना वेळ द्या. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर किती प्रेम करते याची तुम्हाला जाणीव होईल. केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : काळा

कर्क (CANCER – Monday, February 6, 2023)
पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करा. गरिबांना कढी-भात जेवू घाला. करमणुकीसाठी पैसे खर्च कराल. घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करा. स्वत:चे आत्मपरीक्षण करा. व्यावसायिक निर्णय घेताना दडपणाखाली वावरू नका. एकाग्रता वाढण्यासाठी सरस्वती देवीची उपासना करा. मन प्रसन्न राहील अशा कृती करा.
शुभरंग : पांढरा

सिंह (LEO – Monday, February 6, 2023)
इष्टदेवतेच्या पूजेमध्ये लाल कुंकू अर्पण करा. नशिबावर हवाला ठेवून बसून राहू नका. आरोग्याची काळजी घ्या. घरी एखाद्या लहानशा समारंभाचे आयोजन कराल. प्रिय व्यक्तिची काळजी घ्याल. सकाळी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. मनाजोगी खरेदी होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.
शुभरंग : केशरी

कन्या (VIRGO – Monday, February 6, 2023)
गाईला चारा खाऊ घाला. विश्रांतीसाठी वेळ द्याल. घरातील वरिष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेमातून साहचर्य आणि एकोपा तयार होईल. कोणाचेही मन दुखवू नका. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि त्यात यशस्वी होईपर्यंत हेतूबद्दल कोणालाही काही सांगू नका. आपल्या आवडीचे काम हाती घ्याल.
शुभरंग : आकाशी

तूळ (TULA- Monday, February 6, 2023)
गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तांब्याच्या जारमध्ये ठेवून घरात ठेवा. उत्साह वाढेल. एखाद्याला दिलेली वेळ पाळा. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. प्रिय व्यक्तिची भेट घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मन प्रसन्न राहिल. धार्मिक कार्याला भेट द्याल. भरपूर पाणी प्या.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Monday, February 6, 2023)
गुरु किंवा शिक्षकांना पिवळा किंवा केशरी रंगाचे कापड भेट म्हणून द्या. स्वास्थ जपा. पत्रव्यवहार करताना काळजीपूर्वक करा. निर्णय घेताना योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन घ्या. वाण सामानाची खरेदी कराल. लाल रंगाचे वस्त्र परिधान कराल. निसर्गरम्य ठिकाणचा आनंद घ्याल.
शुभरंग : जांभळा

धनु (SAGITTARIUS – Monday, February 6, 2023)
शारीरिक क्षमता वाढण्यासाठी व्यायाम करा. कुटुंबियांसोबत आनंदी राहाल. निवांत आरामाची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात काळ घालवा. प्रियजनांसोबत सहलीला जाऊन मजा करा. नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. एकांतात वेळ घालवावासा वाटू लागेल. जोडीदारासोबत सायंकाळी बागेत फिरायला जाल.
शुभरंग : निळा

मकर ( CAPRICORN – Monday, February 6, 2023)
सकाळी सूर्याचा जप करा. घरातील वरिष्ठांकडून पैसे बचतीचा सल्ला घ्याल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. कौतुकाची थाप मिळेल. स्वत:साठी वेळ काढा. घराच्या परिसरात आवडीचे फुलझाड लावून त्याची जोपासना करा. आवडत्या वस्तूची खरेदी कराल.
शुभरंग : नारिंगी

कुंभ (AQUARIUS – Monday, February 6, 2023)
श्रीकृष्णाचे दर्शन घ्या. सायंकाळी घरात कापराचा धूप करा. आराम कराल. जमवलेले, गुंतवणूक केलेले पैसे आज तुमच्या कामी येतील. आजचा शांततापूर्ण जाईल. इतरांशी अत्यंत काळजीपूर्वक वागा. संयमाने वागावे लागेल. कलेतील कौशल्य वाढीस लागणाऱ्या घटना घडतील.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Monday, February 6, 2023)
आराध्य देवतेची उपासना करा. मित्रमैत्रिणींसोबत आजची सायंकाळ मजेत घालवाल. पैसे काटकसरीने वापरा. प्रेमाच्या दृष्टीने आजचा अत्यंत महत्त्वाचा असेल. नवीन उपक्रम, उद्योग सुरू कराल. स्वत:साठी वेळ काढण्याचा प्रयत्न कराल. कबूतरांना दाणे खाऊ घाला. घराचे सुशोभिकरण कराल.
शुभरंग : सोनेरी