Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘7 डिसेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Wednesday, December 7, 2022)
आर्थिक व्यवहारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंदी व्हाल. वयस्कर व्यक्तिंची सेवा करा. मनाला शांत ठेवण्यासाठी एकांतात वेळ घालवाल. लोकं आज तुमची स्तुती करतील. मेहनतीचे फळ मिळेलच अशी आशा ठेवा. मिळालेल्या सुखांचा मनापासून अनुभव घ्याल. जोडीदारावर ताण येईल, असे वागू नका.
शुभरंग : पांढरा

वृषभ (TAURUS – Wednesday, December 7, 2022)
प्रिय व्यक्तिला लाल रंगाची वस्तू भेट म्हणून द्याल. विशेष व्यक्तिची ओळख होईल. आर्थिक समस्या दूर होतील. घरातील लहान मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ द्यावा लागेल. तातडीचा प्रवास लाभदायक ठरेल. आजचा दिवस सकारात्मक असेल. मिळालेला रिकामा वेळ सत्कार्यासाठी खर्च कराल. व्यावसायिकांना नव्या योजना राबवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. संयम सोडू नका.
शुभरंग : जांभळा

मिथुन (GEMINI – Wednesday, December 7, 2022)
तांब्याच्या भांड्यातले पाणी प्या. पुरेशी विश्रांती घ्याल. पैसे कमवण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करावा लागेल. जोडीदारासोबत व्यतीत केलेल्या जुन्या दिवसांच्या आठवणीत रमाल. प्रवासामुळे प्रेम संबंध प्रस्थापित होतील. नवीन परिचय होण्याची शक्यता आहे. घराच्या अंगणात पांढऱ्या फुलांचे झाड लावून त्याची निगा राखा. आराध्य देवतेच्या दर्शनाला जा. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या लाल कापडात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधा.
शुभरंग : केशरी

कर्क (CANCER – Wednesday, December 7, 2022)
घरातील स्त्रियांचा मान राखा. आहाराची पथ्ये पाळावी लागतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. गणपती अथर्वशीर्षाचे पारायण करा. मित्रमैत्रिणींसोबत सायंकाळ घालवाल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. सकाळी सूर्याचे दर्शन घ्या. गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च झाल्यास त्याचा विचार करत बसू नका. कुटुंबियांपासून दूर एकांतात राहावेसे वाटेल.
शुभरंग : पिवळा

सिंह (LEO – Wednesday, December 7, 2022)
जोडीदाराला गुलाबाचे फूल भेट द्याल. प्रवास तणावपूर्ण असेल. आजचा दिवस चैतन्याने सळसळता असेल. आज घरी तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी खूप पाहुणे येतील. जोडीदारासोबत सायंकाळ चांगली घालवाल. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहाल. आरोग्य चांगले राहिल. सकाळी कोवळ्या उन्हात पायी चाला. सूर्यनमस्कार घाला. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावाल. शंकराच्या पिंडीवर पांढरे फूल आणि बेलाचे पान वाहा.
शुभरंग : पोपटी

कन्या (VIRGO – Wednesday, December 7, 2022)
घरात 28 वेळा मोठ्या आवाजात ओम या जपाचा उच्चार करा. उत्फूर्त वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. एखाद्याचा मूड खराब होईल असे वागू नका. व्यापाऱ्यांनी व्यवहार करताना काळजी घ्यावी. दिवसाची सुरुवात थोडी थकवा आणणारी असेल. जसजसे दिवस पुढे जातील तसतसे तुम्हाला केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळू लागेल. स्वत:साठी वेळ काढा. वेळेचा सदुपयोग कराल. जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल.
शुभरंग : जांभळा

तूळ (TULA- Wednesday, December 7, 2022)
गरिबांना कढी-भात अन्नदान करा. प्रेम, सद्भावना, निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी मनाला उद्युक्त करा. चांगल्या संकल्पना राबवणाऱ्या व्यक्तिची विश्वसनीयताही तापसून पाहाल. नव्या योजनेत गुंतवणूक करावीशी वाटेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस चांगला जाईल. प्रत्येक काम उद्यावर ढकलू नका. जोडीदाराकडून आवडती वस्तू भेट स्वरुपात मिळण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पांढरा

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, December 7, 2022)
सकाळी शिवाचे दर्शन, अभिषेक, फूल-पत्री वाहणे, प्रार्थना करणे, अशा कृती भावपूर्ण करा. आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. खूप आनंदी होणेही काही वेळा समस्येत टाकू शकते, हे लक्षात ठेवा. घरी अनपेक्षितपणे पाहुण्यांचे आगमन होईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. घरात आलेल्या लहान मुलांना खाऊ दिल्याशिवाय पाठवू नका. क्षुल्लक वाद विसरून जोडीदार तुमच्याशी पुन्हा छान बोलू लागेल. कामाच्या ठिकाणी छान ट्रिट मिळेल.
शुभरंग : मोरपिसी

धनु (SAGITTARIUS – Wednesday, December 7, 2022)
घरामध्ये लाल गुलाबाचे झाड लावून त्याची काळजी घ्या. शांत आणि तणावमुक्त राहाल. रिकाम्या वेळेचा आनंद घेण्यासाठी आवडते काम कराल. संगीत, वाचन, पाककृती, फिरणे या आवडीतून नवीन सुचलेल्या गोष्टी अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. मित्र-मंडळी आणि कुटुंबिय यांच्यासोबत थोडा वेळ घालवाल. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ मिळेल. आजचा दिवस उत्साहात जाईल. अनावश्यक विचार करणे टाळा. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहा.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – Wednesday, December 7, 2022)
दूध, खडीसाखर, पांढरे गुलाब कोणत्याही पवित्र ठिकाणी अर्पण करा. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढाल. सायंकाळी दूरचे नातेवाईक घरी येतील. विवाहित महिलांना सासरच्या मंडळींकडून धन लाभाची शक्यता आहे. सुखद क्षण अनुभवाल. प्रिय व्यक्तिच्या प्रेमामुळे आयुष्य मोहरून जाईल. उत्साह आणि चिकाटी टिकवून ठेवा. आहारात डिंकाच्या लाडवांचा समावेश करा.
शुभरंग : आकाशी

कुंभ (AQUARIUS – Wednesday, December 7, 2022)
बराच काळ सुरू असलेले भांडण आजच सोडवा. कोणत्याही नवीन काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी लोकांशी बोलणी करून घ्याल. मानसिक शांततेचा अनुभव घ्याल. आजचा दिवस मौजमजेचा आहे. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान कराल. मानसिक ताण घेऊ नका. शनी स्तोत्राचे वाचन करा. आहारात हिरव्या मुगाचा समावेश करा. लोकांना दिलेले उधार पैसे परत मिळतील.
शुभरंग : हिरवा

मीन (PISCES – Wednesday, December 7, 2022)
घरात गंगाजल शिंपडा. कामाच्या ताणामुळे त्रस्त होण्याची शक्यता आहे. घरात एखादे शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. प्रवास, करमणूक, लोकांमध्ये मिसळणे हेच काम आज दिवसभर करावे लागू शकते. जोडीदारासोबत आज मनसोक्त गप्पा माराल. समाजात लोकं तुमचे कौतुक करतील. कामावर लक्ष एकाग्र करा. भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. घरातील मोठ्या व्यक्तिच्या मार्गदर्शनाची गरज भासू शकते.
शुभरंग : चंदेरी