Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘7 नोव्हेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Monday, November 7, 2022)
मनातली चिंता दूर होईल. कुटुंबियांचा सल्ला ऐकल्याने लाभ होईल. कामे उरकण्याचा वेग वाढवावा लागेल. मनातील नकारात्मक विचार वाढू देऊ नका. सूर्यनारायणाला अर्घ्य द्या. सकाळी तुळशीला पाणी घाला. अनावश्यक बोलण्यात वेळ वाया घालवू नका. आवडता पोषाख परिधान करा.
शुभरंग : सोनेरी

वृषभ (TAURUS – Monday, November 7, 2022)
धनप्राप्तिचा योग आहे. समाजात मान, सन्मान वाढेल. बोलताना विचार करून बोला. कोणतेही काम घाईघाईने पूर्ण करण्याच्या मागे लागू नका. कृष्णाचा नामजप 108 वेळा करा. अंगणात तुळशीचे रोपटे लावा. अनपेक्षितपणे घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार आनंदाने करा. घराचे सुशोभिकरण कराल.
शुभरंग : केशरी

मिथुन (GEMINI – Monday, November 7, 2022)
व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या संकल्पनांचा विचार करावा लागेल. घरी गणपतीची आरती म्हणा. अति रागवणे टाळा. घराचे सुशोभिकरण कराल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. सौंदर्याची काळजी घ्या. नवीन कलांचा आस्वाद घ्याल.
शुभरंग : हिरवा

कर्क (CANCER – Monday, November 7, 2022)
आपल्या कामात कुटुंबाची साथ मिळेल. मेहनतीचे फळ चांगलेच मिळेल. विश्वास ठेवा. कुटुंबातील लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. भगवान शिवाला जल अभिषेक करा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. आहाराची पथ्ये सांभाळावी लागतील. अनावश्यक बोलण्यात वेळ वाया घालवू नका.
शुभरंग : पोपटी

सिंह (LEO – Monday, November 7, 2022)
आर्थिक लाभाचा योग आहे. महत्त्वाच्या व्यक्तिसोबत भेटीचा योग आहे. व्यवसायात प्रगती कराल. व्यवसायवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. सूर्याला अर्घ्य द्या. मनातलं गुपित योग्य व्यक्तिकडेच बोला. पांढऱ्या रंगाचं सोवळ नेसून पूजा करा. घराच्या अंगणात फुलझाड लावून त्याची जोपासना करा. छंद जोपासण्यासाठी वेळ काढाल. समाजात कौतुक होईल.
शुभरंग : लाल

कन्या (VIRGO – Monday, November 7, 2022)
नशिबाची साथ मिळेल. धनप्राप्तीचे नवीन पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आळस सोडून कामाला लागा. प्रवास लाभदायी होईल. शिव उपासना करा. शिवपिंडीवर अभिषेक करून बेलाचं पान वाहा. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेटगाठ होण्याची शक्यता आहे. अंघोळीच्या पाण्यात भिमसेनी कापूर घाला. लोकं तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करतील.
शुभरंग : चॉकलेटी

तूळ (TULA- Monday, November 7, 2022)
मानसन्मान आणि यशात वाढ होईल. सुख-सुविधांची प्राप्ती होईल. अडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहिल. दुर्गास्तोत्र वाचा. झोपण्याकरिता चटईचा वापर करा. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढा. पाणी गरम करून प्या. आवड जोपासण्यासाठी वेळ द्याल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. घराबाहेर जाताना थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या.
शुभरंग : चंदेरी

वृश्चिक ( SCORPIO – Monday, November 7, 2022)
तुमच्यातील प्रतिभेमुळे तुम्हाला यश मिळेल. लोकं तुमचे म्हणणे ऐकतील. कोणाशीही उद्धटपणे वागू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. मारुतीरायाचे दर्शन घ्या. प्रिय व्यक्तिसोबत मनमोकळ्या गप्पा होतील. आवडीचा पदार्थ खाल. स्वत:साठी वेळ काढाल. लोकांचे ऐकून स्वत:ला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे कृती कराल.
शुभरंग : गुलाबी

धनु (SAGITTARIUS – Monday, November 7, 2022)
आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. अडलेली कामे पूर्ण होतील. सहलीला जाण्याचा प्लॅन कराल. गायत्री मंत्राचा एक माळ जप करा. आवडते पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढाल. कार्यायलयीन कामात व्यस्त राहाल. आहारात फळांचा समावेश करा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा करा. कुमारिकांना गोड पदार्थ खाऊ घाला.
शुभरंग : तांबडा

मकर ( CAPRICORN – Monday, November 7, 2022)
मनातील ताणतणाव दूर होतील. कुटुंबात सुख-शांती वाढेल. कामात येणारे अडथळे दूर होतील. नवीन ओळखी होतील. गुंतवणूक कराविशी वाटेल. मोत्याच्या दागिन्यांची खरेदी कराल. जोडीदारासोबत बागेत फिरायला जाल. घरातील वातावरण प्रसन्न राहिल. व्यवसायात यश मिळेल.
शुभरंग : निळा

कुंभ (AQUARIUS – Monday, November 7, 2022)
कोणाशीही वादविवाद घालू नका. भावनाशील होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबाकडून मदत मिळेल. आर्थिक लाभाकरिता प्रयत्न वाढवावे लागतील. घरातील लहान मुलांसोबत बागेत फिरायला जाल. विश्रांती घेण्यासाठी वेळ काढाल. चेहरा सकारात्मक ठेवा. भावंडं मदत करतील. सिनेमा पाहायला जाल. गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर आता पैसे खर्च करू नका.
शुभरंग : नारिंगी

मीन (PISCES – Monday, November 7, 2022)
कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. सहलीला जाण्याचा प्लान आखाल. प्रत्येक काम समजून-उमजून करा. विष्णुसहस्त्रनामावलीचा पाठ करा. आर्थिक स्थिती लाभदायक असेल. अनुभवी लोकांसोबत व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न कराल. आपल्या कामाचे कौतुक होईल. स्वत:च्या आनंदात रममाण व्हाल. लोकं तुमच्यावर खूश होतील. जोडीदाराचं तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे, याची तुम्हाला जाणीव होईल.
शुभरंग : खाकी