Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘8 डिसेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Thursday, December 8, 2022)
दिवसाची सुरुवात योगासने करून करा. सूर्याचे दर्शन करून 11 वेळा गायत्री मंत्र म्हणा. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्वत:साठी वेळ काढाल. जोडीदार तुमची जास्त काळजी घेईल. मित्रांसोबत सायंकाळ घालवायला आवडेल. कामाच्या ठिकाणी उत्साही राहाल. अनावश्यक काळज्यांना दूर सारा. ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : पांढरा

वृषभ (TAURUS – Thursday, December 8, 2022)
कुमारिकांना पांढरी मिठाई वितरीत करा. जोडीदार आज तुमच्यासाठी भरपूर पैसे खर्च करेल. आवडीच्या पुस्तकाचे वाचन कराल. ताणतणावाशी सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कुटुंबियांना वेळ द्याल. कुणीतरी खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान कराल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Thursday, December 8, 2022)
एकाच दोन दोन गोष्टी मिळवण्याच्या मागे लागू नका. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न कराल. घनिष्ट मित्रांसोबत रिकाम्या वेळेचा आनंद घ्याल. एखादे सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे. जवळचे नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. तुम्हाला जे हवे आहे ते आज मिळण्याची शक्यता आहे. उगाचच कोणाशी वाद घालण्याच्या फंदात पडू नका. इतरांवर जबरदस्ती करू नका.
शुभरंग : आकाश

कर्क (CANCER – Thursday, December 8, 2022)
खिशात हिरव्या रंगाचा रुमाल ठेवा. आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त कराल. आवडत्या व्यक्तिसोबत चर्चा करण्याची संधी मिळेल. कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. कामात वेळ जाईल. सुरक्षित आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. छंद जोपासण्यासाठी वेळ द्याल. इतरांची गरज समजून घ्या. लोखंडी तव्यावर भाजलेले पदार्थ खा.
शुभरंग : काळा

सिंह (LEO -Thursday, December 8, 2022)
घरातील जुनी, फाटलेली पुस्तके लवकर बायडिंग करून वापरा. कार्यालयातील वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. घरात करायच्या बदलांबाबत ज्येष्ठांचा सल्ला घ्याल. शुभकार्य घरीच करा. दागिन्यांची खरेदी करण्याची इच्छा निर्माण होईल. पथ्यपाणी नीट सांभाळा. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. घरातील फुलदाणीत मोरपीसे ठेवा.
शुभरंग : मोरपिसी

कन्या (VIRGO – Thursday, December 8, 2022)
घरातील रद्दी वेळच्या वेळी घराबाहेर काढा. व्यसने सोडा. कामाच्या ठिकाणी तुमची दखल घेतली जाईल. भविष्यासाठी आर्थिक नियोजन कराल. घरातील वस्तू जागच्या जागी ठेवा. लोकं आज तुमच्या कलेला दाद देतील. उगाचच कोणाला घाबरून नका. अंगणात गोकर्णाचा वेल लावा. शिव मंदिरात जाऊन अभिषेक करून शिवाला पांढरे फूल वाहा. आजचा दिवस उत्तम आहे.
शुभरंग : केशरी

तूळ (TULA- Thursday, December 8, 2022)
शिवलिंगावर कच्चे दूध वाहा. कार्यालयातून लवकर घरी जाल. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. सकाळी चालण्याचा व्यायाम करा. डोळ्यांची काळजी घ्या. भविष्याचे योग्य नियोजन कराल. मनात केलेला सकारात्मक विचार आज फळाला येईल. नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेवू नका. प्रिय व्यक्ती अनपेक्षित भेटू शकते. जुन्या चुका दूर करण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : राखाडी

वृश्चिक ( SCORPIO – Thursday, December 8, 2022)
उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नका. उगाचच ताण घेऊ नका. जवळच्या माणसांबरोबर कोणताही वादविवाद घालू नका. निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली येऊन निर्णय घेऊ नका. आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. आवडते संगीत, कला, छंद जोपासण्याठी वेळ मिळेल. पूर्ण करता न येणारी आश्वासने कोणालाही देऊ नका.
शुभरंग : चिंतामणी

धनु (SAGITTARIUS -Thursday, December 8, 2022)
घरात कापराचा धूप करा. मनातील नकारात्मक विचार झटकून टाका. मानसिक समाधान मिळेल. घरातील वातावरणात चांगला बदल होईल. लोकांसोबत वादात अडकू नका. श्रेष्ठ व्यक्तिंसोबत केलेल्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना सुचतील. कोणी तुमचा मूड खराब करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याकडे दुर्लक्ष कराल. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – Thursday, December 8, 2022)
सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम करा. थोडासा व्यायाम करून दिवसाची सुरुवात करण्याची सवय लावून घ्या. अनुभवी लोकांसाठी वेळ काढाल. नव्या कल्पना राबवण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. पैशांची बचत कराल. देवळात जाऊन मारुतीचे दर्शन घ्या. कलेतील कौशल्यात वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न कराल.
शुभरंग : आकाशी

कुंभ (AQUARIUS – Thursday, December 8, 2022)
घरातील भावंडांसाठी नव्या कपड्यांची खरेदी कराल. मानसिक ताणापासून दूर राहण्यासाठी ध्यानधारणा कराल. पैसे कमवण्याच्या नव्या संकल्पना अंमलात आणा. प्रियकरासोबत असताना नाटकीपणाने वागून वागणुकीत बदल करू नका. आजचा दिवस मौजमजेचा आहे. घरातील तुळशीला पाणी घालून नमस्कार करा.
शुभरंग : हिरवा

मीन (PISCES – Thursday, December 8, 2022)
घरातील मोठ्यांच्या विचारांचा आदर करा. घरगुती कामं कंटाळवाणी होतील. आरोग्याची काळजी घ्याल. सायंकाळी बागेत फिरायला जाल. कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण असेल. आजचा दिवस कामात जाईल. लक्ष्मीमातेचे दर्शन घ्या. तिला वेलची आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. जोडीदाराकडून सुखद अनुभव येईल.
शुभरंग : चंदेरी