Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘9 ऑगस्ट’चे राशीभविष्य

 

मेष (ARIES – Tuesday, August 9, 2022)
आपल्या मनाला पटेल तेच करा. प्रत्येक गोष्टीत सतर्क राहा. आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या. कामात काटेकोर राहा. स्वत:चे निर्णय स्वत:च घ्या. आवाक्याबाहेरची कामे उरकून घ्या. आहारातील पथ्ये पाळा.
शुभरंग : हिरवा

वृषभ (TAURUS – Tuesday, August 9, 2022)
दुसऱ्यावर विसंबून राहू नका. दुसऱ्याच्या भांडणात पडू नका. कर्तबगारीने पुढे जाण्याच्या प्रयत्न कराल. कोणाला उधार उसनवार देऊ नका. इतरांना सहकार्य कराल. केलेल्या श्रमाचे चीज होईल.
शुभरंग : मोरपिसी

मिथुन (GEMINI – Tuesday, August 9, 2022)
आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. नवीन ओळखी करून घ्याल. कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. घराबाहेर जाताना आईवडिलांना नमस्कार करा. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. अतिरेक त्रासदायक होणार नाही याची काळजी घ्या.

शुभरंग : सोनेरी

कर्क (CANCER – Tuesday, August 9, 2022)
बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. संधीचा फायदा घ्याल. वाहने जपून चालवा. मिळालेल्या रिकाम्या वेळेत आवडत्या गोष्टी कराल. दुसऱ्याच्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग : आकाशी

सिंह (LEO – Tuesday, August 9, 2022)
झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्याल. अभ्यासाची गोडी लागेल. टोकाचा विचार करू नका. विचार कृतीत आणाल. आर्थिक गुंतवणूक कराल. स्वत:च्या छंदांसाठी वेळ काढाल. आवडते फुलझाड अंगणात लावा.
शुभरंग : निळा

कन्या (VIRGO – Tuesday, August 9, 2022)
नैतिक आचरण चांगले ठेवा. घरात कोणाशीही वाद घालू नका. खर्चापेक्षा बचतीचा कल वाढवा. मेहनतीच्या बळावर यश मिळवाल. विष्णुसहस्त्रनामावलीचे वाचन करा. मित्रांसोबत जास्त वेळ घालवाल.
शुभरंग : राखाडी

तूळ (TULA- Tuesday, August 9, 2022)
घरातील वातावरण सुखद राहील. सही करताना काळजी घ्या. शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कलेत प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न कराल. झोपण्याकरिता चटईचा वापर कराल. आवडत्या वस्तूंची खरेदी कराल.
शुभरंग :जांभळा

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, August 9, 2022)
गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा. मार्गदर्शनाची गरज भासू शकते. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. कार्यालयात एकोपा वाढीस लागेल. घरदुरुस्तीची कामे रेंगाळणार नाहीत याची काळजी घ्या. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : लाल

धनु (SAGITTARIUS – Tuesday, August 9, 2022)
सामंजस्याने वागा. नवे शिकण्याचा प्रयत्न कराल. थोर आणि व्यक्तिंना मान द्या. नातेवाईकांवर अवलंबून राहू नका. कोणाशीही वाद घालू नका. सकाळी तुळशीला पाणी घाला.
शुभरंग : पांढरा

मकर (CAPRICORN – Tuesday, August 9, 2022)

जवळच्या व्यक्तिंना दुखवू नका. विचारांमध्ये सुधारणा करावी लागेल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. झोप पूर्ण करा. अथर्वशीर्ष म्हणा. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. आवडता पदार्थ खायला मिळेल.
शुभरंग : चंदेरी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, August 9, 2022)
कुटुंबियांसाठी वेळ द्याल. थकवा जाणवण्याची शक्यता आहे. कोणतेही साहस करताना योग्य विचार करा. आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. मोठ्या व्यक्तिंचा मान राखा. शिवाला अभिषेक करा.
शुभरंग : खाकी

मीन (PISCES – Tuesday, August 9, 2022)
अचानकपणे येणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. मानसिक संतुलनाकडे लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घ्या. आवडीच्या वस्तूंची काळजी घ्या.
शुभरंग : पिवळा