Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘9 डिसेंबर’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Friday, December 9, 2022)
कोणावरही आंधळा विश्वास टाकू नका. कौटुंबिक सौख्याचा अनुभव घ्याल. कोणालाही जामीन राहण्यापासून दूर राहाल. घरातील लहान मुलांकडून चांगली बातमी कानावर येईल. महालक्ष्मीदेवीचे दर्शन घ्या. घरातील वडीलधाऱ्यांसोबत वेळ घालवा. कार्यालयातून लवकर घरी जाण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : काळा

वृषभ (TAURUS – Friday, December 9, 2022)
खव्याची मिठाई, रसगुल्ला, चॉकलेट किंवा गोळ्या लहान मुलांना वाटा. मनासारखे फळ मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. अनावश्यक सल्ले कोणालाही देऊ नका. वादग्रस्त विषय टाळा. प्रिय व्यक्ती आज तुमच्यासाठी वेळ काढेल. वायफळ गप्पा मारण्यापेक्षा कामात स्वत:ला गुंतवून घ्या. जवळच्या व्यक्तिकडून आर्थिक मदत मिळेल.
शुभरंग : आकाशी

मिथुन (GEMINI – Friday, December 9, 2022)
माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. धन लाभाची शक्यता आहे. खासगी आयुष्याविषयी मित्र सल्ला देतील. ज्येष्ठ व्यक्तिसोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यात रंगून जाल. कुटुंबियांसोबत फिरायला जाण्याचा प्लान आखाल. घरात काचेच्या मोठ्या बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये फुले ठेवा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
शुभरंग : मोरपिसी

कर्क (CANCER – Friday, December 9, 2022)
चांदीच्या पेल्यातून पाणी प्या. सभोवतालच्या लोकांमुळे मनोधैर्य वाढेल. मनाला शांती मिळेल. सतत हसतमुख स्वभावामुळे इतरांवर प्रभाव पाडाल. वकिलांना भेटण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कार्यालयातील वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. एकांतात राहून पुस्तक वाचन, संगीत इत्यादी कलांचा आनंद घ्यावासा वाटेल.
शुभरंग : केशरी

सिंह (LEO – Friday, December 9, 2022)
हिरव्या बाटल्यांमध्ये झाडे लावा. मनात सकारात्मक विचार सुरू ठेवा. कोणाकडून पैसे उधार मागू नका. इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. प्रियकराची मनधरणी करावी लागेल. मानसिक स्वास्थ्य जपा. प्रकृतीची काळजी घ्या. आराध्यदेवतेचे दर्शन घ्याल. कोणाशीही वादविवाद घालू नका. मेहनतीचे योग्य फळेल.
शुभरंग : पोपटी

कन्या (VIRGO – Friday, December 9, 2022)
पिगी बँकेत नाणी जमा करा. यात्रेकरूंना मदत करा. बँकेतील व्यवहार काळजीपूर्वक कराल. घरातील कामांमध्ये व्यस्त राहाल. रिकामा वेळ कलेतील कौशल्य वाढीस लागण्यासाठी वापरा. कुटुंबाची साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम आहे. मनातील गोष्ट जोडीदाराकडे बोलण्यासाठी वेळ काढाल. सकाळी तुळशीला पाणी घाला.
शुभरंग : चिंतामणी

तूळ (TULA- Friday, December 9, 2022)
आहारात दूध आणि दह्याचा समावेश करा. विश्रांती घ्या. कामात व्यग्र असताना अधूनमधून आराम करा. प्रवासात महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवा. लोकं तुमचे कौतुक करतील. प्रलंबित घरगुती प्रश्न सोडवण्यासाठी आजचा दिवस लाभदायक आहे. प्रेयसीला गुलाबाचे फूल भेट द्या. आवडत्या व्यक्तिला दुखवू नका.
शुभरंग : पांढरा

वृश्चिक ( SCORPIO – Friday, December 9, 2022)
आरोग्याची काळजी घ्या. जुनी येणी वसूल होतील. कामाचे नियोजन कराल. ताण घेऊ नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या व्यक्तिंशी कामाच्या बाबतीत चर्चा कराल. नाती जपा. आहारात उष्ण पदार्थांचा समावेश कराल. निर्णय घेताना इतरांचा विचार करा. जुन्या संबंधांना उजाळा मिळेल. घरात शोभेचे झाड लावा.
शुभरंग : चिंतामणी

धनु (SAGITTARIUS – Friday, December 9, 2022)
स्वास्थ्य उत्तम राहिल. मित्रांसोबत गाठीभेटीचा प्लान आखाल. किमती वस्तूंची काळजी घ्या. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. दत्त महाराजांचे दर्शन घ्या. हाताखालचे लोक सहकार्य करतील. आवडते वस्त्र परिधान करा. कामातून आनंद मिळेल. वाढत्या कामामुळे मौजमजा कमी करायला मिळेल. पर्समध्ये दोन वेलची ठेवा. घरातील किमती वस्तूंची काळजी घ्या.
शुभरंग : मोरपिसी

मकर ( CAPRICORN – Friday, December 9, 2022)
कौशल्याने सगळ्या गोष्टी निभावून न्याल. सुखद दिवसांचा अनुभव घ्याल. कोणाचेही रागावून बोलणे मनाला लावून घेऊ नका. उगाचच अतिविचार करणे टाळा. हिरव्या चण्यांचा आहारात समावेश करा. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. विश्रांती घेण्यासाठी वेळ काढा. जोडीदारासोबत मनोरंजनाचे कार्यक्रम बघाल.
शुभरंग : सोनेरी

कुंभ (AQUARIUS – Friday, December 9, 2022)
पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. मोकळा वेळ भरपूर मिळेल. प्रिय व्यक्तिसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद घ्याल. शनी स्तोत्र वाचा. काळजी करत बसू नका. आजचा दिवस मौजमजेचा आहे. लोकांमध्ये मिसळाल. कारण काहीही असो उगाच मनाला त्रास करून घेऊ नका. गुलाबाचे रोपटे अंगणात लावा.
शुभरंग : हिरवा

मीन (PISCES – Friday, December 9, 2022)
मानसिक भीती बाळगू नका. लहान मुलींना खाऊ घाला. सकारात्मक विचार करा. प्रलंबित देणी देऊन टाका. जोडीदाराचा मूड फारसा चांगला नसेल. कौतुकाची थाप मिळेल. अनपेक्षित बक्षीत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मताचे समाजात कौतुक होईल. मत मांडायला उगाच भीड बाळगू नका. आवडती कला शिकण्यासाठी प्राधान्य द्याल.
शुभरंग : चॉकलेटी