विद्यापीठाच्या संग्रहालयातील नाणी न्यायालयात जमा करण्याचे आदेश
मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस संग्रहालयात असलेली ऐतिहासिक नाणी न्यायालयात जमा करा, असे आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दिले. तसेच ऐतिहासिक नाणी जतन करण्यासाठी कोणकोणती पावले उचलली, याचा सविस्तर तपशील प्रतिज्ञापत्राद्वारे 22 ऑक्टोबरपूर्वी न्यायालयात सादर करण्यास सांगितले. दहा वर्षांपूर्वी फारुख टोडीवाला व इतरांनी मुंबई विद्यापीठाच्या संग्रहालयातील ऐतिहासिक नाण्यांच्या संवर्धनाचा मुद्दा उपस्थित करीत जनहित याचिका केली होती. या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
एमडीचा कारखाना उध्वस्त
महसूल गुप्तवार्ता संचनालयाने (डीआरआय ) मुंबई युनिटने मध्य प्रदेशातील एमडी ड्रगचा कारखाना उध्वस्त केला. डीआरआयने कारवाई करून पावडर स्वरूपातील 36 किलो मेफ्रेड्रॉन आणि 76 किलो लिक्विड स्वरूपातील मेफ्रेड्रॉन आणि इतर कच्चा माल जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांना डीआरआय ने अटक केली. मध्य प्रदेश येथील एमडी कारखान्याची माहिती डीआरआय मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर डीआरआयने मध्य प्रदेशच्या झाबुआ येथे छापा टाकून ड्रगचा कारखाना उद्धवस्त केला. डीआरआय ने कारवाई करून 36 किलो मेफ्रेड्रॉन आणि 76 किलो लिक्विड स्वरूपातील मेफ्रेड्रॉन आणि इतर कच्चा माल आणि उपकरणे जप्त केली.
कोकणातील सात खाडी पुलांच्या कामांचे भूमिपूजन
कोकणात विकास महामंडळाच्यातीने सात हजार कोटी रुपये खर्चून विविध पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. तर पनवेल ते सिंधुदूर्ग दरम्यानच्या कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर पाच तासात पार करता येईले. ठाणे खाडी पूल क्र.तीन च्या उत्तर वाहिनीच्या लोकार्पणाबरोबर धरमतर, पुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि पुणकेश्वर या सात खाडी पुलांचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हीडीओ काँफरन्ससक्दारे झाले.
राज ठाकरे विधानसभा स्वबळावर लढणार
आगामी विधानसभा निवडणुकीत आपण स्वबळावर महाराष्ट्रात सामोरे जाणार आहोत. या निवडणुकीत ना युती ना आघाडी, असे स्पष्ट करीत आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावरच लढणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जाहिर केले. आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात. हे त्यांना कोणी सांगितले माहिती नाही. भाजप यांना स्वीकारतो तरी कसा? अजित पवार भाजपात यायच्या आठ दिवस अगोदर मोदी म्हणाले होते की, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकू. पण जेलमध्ये टाकण्याएवजी त्यांना मंत्रिमंडळात टाकले, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
उमेद अभियानच्या प्रेरिकांना भाऊबीज भेट देण्याची मागणी
उमेद अभियानमधील प्रेरिकांना (सीआरपी) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दिवाळीला भाऊबीज भेट मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र श्रमिक सभेने केली आहे. राज्य सरकारने उमेद अभियानांतर्गत प्रेरिकांची नियुक्ती केली आहे. थकित मानधन तसेच अंगणवाडी सेविका व मदतनिसांप्रमाणे प्रेरिकांनाही दिवाळीसाठी भाऊबीज भेट मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र श्रमिक सभेचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, सरचिटणीस केतन कदम व सल्लागार संजय परब यांना सरकारकडे केली आहे.