दैनिक ‘सामना’ आणि ‘झी मराठी’ आयोजित ‘उत्सव नात्यांचा’

आज वाशी येथे धम्माल मनोरंजन आणि आकर्षक बक्षिसे आपल्या आवडत्या झी मराठी कलाकारांना भेटण्याची संधी महाराष्ट्राची महावाहिनी म्हणजेच ‘झी मराठी.’ गेली 23 वर्षे ही वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर वेगवेगळे विषय नेहमीच हाताळले जातात. काळानुरूप बदललेल्या प्रेक्षकांसोबत ‘झी मराठी’देखील बदललेली दिसून येतेय. ‘झी मराठी’चे बदललेले रूप प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. म्हणूनच पडद्यावर दाखवल्या जाणाऱया नायिका या अन्याय सहन करणाऱया किंवा सोशीक राहिलेल्या नसून जिद्दी, महत्त्वाकांक्षी आणि आधुनिक विचारांच्या दाखवल्या जात आहेत आणि म्हणूनच हा नात्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘झी मराठी’ आणि दैनिक ‘सामना’ आपल्यासाठी घेऊन येत आहे एक धमाकेदार संध्याकाळ, जिथे आपण भेटणार आहोत आपल्या आवडत्या ‘झी मराठी’वरील कलाकारांना. सोबत धमाल मजामस्ती, आकर्षक बक्षिसे आणि येवल्याची पैठणी जिंकण्याची संधी.

विशेष उपस्थिती
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेतील अप्पी आणि अर्जुन, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अधिपती, ‘दार उघड बये’ मालिकेतील मुक्ता, सारंग आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील नेत्रा आणि रूपाली.